

पुढारी ऑनलाइन डेस्क : Trump post on 'X' : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांना X (ट्विटर) चे अकाउंट पुन्हा सक्रिय केल्यानंतर तब्बल 9 महिन्यांनी X (ट्विटर) वर पुनरागमन केले आहे. मस्क यांनी त्याचे खाते सक्रिय केल्यानंतर जवळपास 9 महिन्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच X वर पोस्ट केले आहे. यामध्ये ट्रम्प यांनी गुरुवारी जॉर्जियाच्या फुल्टन काउंटी शेरिफ तुरुंग प्रशासनाने काढलेला मगशॉट (आयकार्ड साइज फोटो) शेअर केला आहे. त्यावर एलन मस्क यांनी 'Next Leval' (नेक्स्ट लेव्हल) म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना जॉर्जिया निवडणूक निकाल उलटल्याप्रकरणी आरोप करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांनी जॉर्जियातील फुल्टन काउंटी तुरुंगात आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना गुरुवारी औपचारिक रित्या अटक करण्यात आली. फुल्टन काउंटी शेरिफ तुरुंगाने त्यांचा मगशॉट (तुरुंग प्रशासनाकडून काढण्यात आलेला आयकार्ड साइज फोटो) घेऊन तो शेअर केला. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. नंतर ट्रम्प यांना अवघ्या 20 मिनिटांमध्ये दोन लाख डॉलर आणि काही अटींच्या आधारे जामिनावर सोडून देण्यात आले.
X पूर्वीच्या ट्विटरने 2021 मध्ये ट्रम्प यांचे अकाउंट निलंबित केले होते. त्यांनी हिंसेच्या समर्थनार्थ भडकाऊ ट्विट केले होते. त्यामुळे ट्विटरने 8 जानेवरी 2021 ला बॅन केले होते. मस्क यांनी 27 ऑक्टोबर 2022 मध्ये ट्विटरचे अधिग्रहण केले. नंतर मस्क यांनी सर्वे करून डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट पुन्हा सुरू केले. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2022 रोजी एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते पुन्हा सक्रिय केले. मात्र, ट्रम्प यांनी तेव्हापासून आतापर्यंत याचा उपयोग केला नव्हता. दरम्यान, मस्क यांनी ट्विटरचे नाव बदलून X केले आहे.
या X वर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी फुल्टन काउंटीचा मगशॉट शेअर करत निवडणूक घोटाळ्याप्रकरणी कधीही आत्मसमर्पण करणार नाही, असे म्हटले आहे. त्यांच्या पोस्टला मस्क यांनी पुन्हा पोस्ट करत त्याला नेक्स्ट लेव्हल अशी प्रतिक्रिया दिली आहे. Trump post on 'X'
हे ही वाचा :