

पुढारी ऑनलाईन डेस्क : १५ ऑगस्टपूर्वी भारत-पाकिस्तान सीमेवर सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू- काश्मीरच्या पूंछमधील देगवार तेरवानच्या भागात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. परिसरात अद्याप शोधमोहीम सुरू आहे, असे लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल यांनी सांगितले.
दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न केला जातो, पण नेहमीप्रमाणे भारतीय लष्काराने दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला.
हेही वाचा :