दहशतवाद्यांचे कोंढव्यात झाले बॉम्बचे प्रशिक्षण

दहशतवाद्यांचे कोंढव्यात झाले बॉम्बचे प्रशिक्षण

पुणे : कोंढवा भागात दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासात ही माहिती समोर आली आहे. कोंढव्यातील 'इसिस'च्या हस्तकांचा गट उद्ध्वस्त करण्यात आल्याचे एटीएसच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, दै. 'पुढारी'ने 15 दिवसापूर्वीच याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताला आता दुजोरा मिळाला आहे. 'इसिस'च्या महाराष्ट्र गटाकडून तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्याचे काम सुरू होते.

एटीएसने कारवाई करून दहशतवाद्यांची दुचाकी, कार जप्त केली. तसेच पिस्तूल आणि पाच काडतुसेही जप्त केली आहेत. दहशतवाद्यांकडून रासायनिक पावडर, द्रव्ये, प्रयोगशाळेतील उपकरणे, पिपेट असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी बॉम्ब तयार करण्याचे साहित्य पुुरून ठेवले होते. एटीएसच्या पथकाने बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे.

एटीएसने मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतलेल्या झुल्फिकार अली बडोदावाला याने महंमद युनूस महंमद साकी आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान यांना पुण्यात आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे. जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) साकी आणि खान यांचा शोध घेत असताना बडोदावाला याने त्यांना पुण्यात आणून त्यांच्यामार्फत बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news