ट्युनिशियाच्या किनारपट्टीवर पुन्हा मोठा अपघात; स्थलांतरित जहाज बुडाल्याने ४ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक बेपत्ता | पुढारी

ट्युनिशियाच्या किनारपट्टीवर पुन्हा मोठा अपघात; स्थलांतरित जहाज बुडाल्याने ४ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक बेपत्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्युनिशियातील केरकेना बेटावर स्थलांतरित जहाज पलटी झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून अद्याप ५१ बेपत्ता आहेत. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. जहाजावरील सर्व प्रवासी उप-सहारा आफ्रिकेतील होते.

उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. जीव धोक्यात घालून लोक बोटीच्या साहाय्याने प्रवास करत असून त्यामुळेच बोट बुडण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. तेथील मंत्र्यांनी जुलैमध्ये सांगितले की ट्युनिशियाच्या तटरक्षक दलाने या वर्षी १ जानेवारी ते २० जुलै या कालावधीत त्यांच्या किनारपट्टीवर बुडलेल्या स्थलांतरितांचे ९०१ मृतदेह बाहेर काढले आहेत.

यापूर्वी २३ मार्च रोजी ट्युनिशियाच्या आग्नेय किनार्‍यावर अनेक आफ्रिकन स्थलांतरित बोटी बुडाल्या. त्यादिवशी झालेल्या अपघातांमध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला होता तर ३३ जण बेपत्ता झाले होते. हे सर्व लोक भूमध्य समुद्र पार करून इटलीला पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यूएनच्या आकडेवारीनुसार, या वर्षी इटलीमध्ये आलेल्या किमान १२ हजार स्थलांतरितांनी ट्युनिशिया सोडले. गेल्या वर्षी याच कालावधीत १३ हजार होते.

हेही वाचा : 

Back to top button