Uttarakhand landslide : केदारनाथ यात्रा मार्गावर भूस्खलन; तिघांचा मृत्यू, 17 बेपत्ता

Uttarakhand landslide
Uttarakhand landslide

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंडजवळ भूस्खलन  झाले. भुस्खलन झाले तो  भाग  केदारनाथच्या अगोदर १६ किमी आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर १७ जण बेपत्ता झाले आहेत. (Uttarakhand landslide)

माहितीनुसार उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंडजवळ झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत तिघांचा मृत्यू  तर १७ जण बेपत्ता झाले आहेत. डोंगरावरून आलेल्या या ढिगाऱ्यात रस्त्यालगतची दोन दुकाने आणि ढाबे वाहून गेली आहेत. या दुकानांमध्ये आणि ढाब्यांमध्ये ४ स्थानिक लोक आणि १६ नेपाळी वंशाचे लोक होते. एसडीआरएफची शोधमोहीम सुरू आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news