Manipur Violence : मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब; पोलीस अधिकारी ठार; सुरक्षा दलाची शस्त्रास्त्रे लुटली | पुढारी

Manipur Violence : मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब; पोलीस अधिकारी ठार; सुरक्षा दलाची शस्त्रास्त्रे लुटली

Manipur Violence : हवेत गोळीबार, अश्रूधुराचा वापर

इम्फाल : मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात सातत्याने पोलिसांची शस्त्रे लुटण्याचे प्रकार घडले आहेत. अशाच एका प्रकारात मणिपूरमध्ये जमावाने भारतीय राखीव दलाच्या तुकडीची शस्त्रास्त्रे लुटली आहेत. ही घटना नारासेना येथे घडली. लुटामारीच्या घटनांत आतापर्यंत जमावाने पोलिसांची ४ हजार शस्त्रात्रे लुटली आहेत, यातील १६०० शस्त्रास्त्रे परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. Manipur Violence

इतर पश्चिम इम्फालमध्ये झालेल्या हिंसाचारात एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या झाली आहे, अशी बातमी NDTVने दिली आहे.

द वायर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार जवळपास ५०० जणांच्या जमावाने भारतीय राखीव बटालियनच्या स्टेशनवर हल्ला केला. या जमावातील बरेच लोक लहान वाहनांतू आले होते .स्टेशनव हल्ला करून विविध प्रकारच्या रायफल, पिस्तूल, काडतुसे, अश्रूधूर आदी लुटण्यात आले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी ३२७ गोळ्या झाडल्या आणि अश्रूधुराच्या २० नळकांड्या फोडल्या.

Manipur Violence बिष्णुपूरमध्ये हवेत गोळीबार

गुरुवारी बिष्णुपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला. कुकी समुदायाने येथे दंगलीतील मृतांवर सामुदायिक दफनविधी करण्याचा निर्णय घेतला होता. हा दफनविधी नंतर रद्द करण्यात आला. पण तोपर्यंत या दफनविधीला विरोध करण्यासाठी मैतेयी समुदायाच्या महिला मोठ्या संख्येने येथे जमल्या होत्या. येथील तणाव निवळण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या घटनेत अनेक महिला जखमी झाल्या आहेत.

हेही वाचा

Back to top button