Manipur viral video case | मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी CBI कडून एफआयआर दाखल | पुढारी

Manipur viral video case | मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी CBI कडून एफआयआर दाखल

पुढारी ऑनलाईन : मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एफआयआर नोंदवला आहे. मणिपूरमध्ये तीन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याची धक्कादायक घटना ४ मे रोजी घडली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी एफआयआर नोंदवला असल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Manipur viral video case)

मणिपूर व्हायरल व्हिडिओचे देशभरात पडसाद उमटले होते. संसदेतही या मुद्यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचाराने ग्रासलेल्या मणिपूरमधील एका व्हिडीओने अवघ्या देशाला सुन्न केले होते. आदिवासी महिलांवर झालेल्या या अन्यायाच्या घटनेचा तपास केंद्रीय तपास संस्था सीबीआय करणार आहे.

गुरुवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात माहिती दिली होती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारवर टिकास्त्र सोडले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातदेखील विरोधकांनी गदारोळ घालत विरोधात दर्शवला. यातच मणिपूरमधील या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने तपासाला वेग मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

ज्या मोबाईल फोनवरून हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता तो फोन आणि संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा फोन सीबीआयला सुपूर्द करण्यात आला आहे.
हे ही वाचा :

Back to top button