मनीष सिसोदिया यांना अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार | पुढारी

मनीष सिसोदिया यांना अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

पुढारी वृत्तसेवा , नवी दिल्ली : अबकारी कर घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेल्या ‘आप’ नेते मनीष सिसोदिया यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याआधी कनिष्ठ न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सिसोदिया यांच्या अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भट्टी यांच्या खंडपीठाने 4 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. यामुळे सिसोदिया यांना ऑगस्ट महिना तुरुंगातच काढावा लागणार आहे. पत्नीच्या आजारपणामुळे जामीन दिला जावा, अशी विनंती सिसोदिया यांनी केली आहे.

.हेही वाचलं का 

वाढत्या तापमानाचा प्राण्यांवरही होतोय विपरीत परिणाम

‘डी.एड’ साठी नगर जिल्ह्यातून अवघे 515 प्रवेश

नगर : जोर्वे पिंपरणे रस्त्यावरील प्रवरानदी पुलाला भगदाड

Back to top button