नगर : जोर्वे पिंपरणे रस्त्यावरील प्रवरानदी पुलाला भगदाड

नगर : जोर्वे पिंपरणे रस्त्यावरील प्रवरानदी पुलाला भगदाड
Published on
Updated on

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : जोर्वे ते पिंपरणे या प्रवरा नदीवरील पुलाच्या कडेला मोठे भगदाड पडले आहे .त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची ताट शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांध काम विभागाने याची वेळीच दखल घेऊन एखादी दुर्घटना घडण्याच्या अगोदर पुला वर पडलेले भगदाड बुजविणे गरजेचे आहे. संगमनेर तालुक्यातील जोर्वे ते पिंपरणे कनोली या दोन गावांकडे जाणारा महत्त्वपूर्ण असणार्‍या रस्त्यावर प्रवरा नदी पुलावरुन दुचाकी चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते.

गेल्या वर्षी याच पुलाचे संरक्षक कठडे तोडून एक मालवाहू पिकअप नदीत कोसळली होती. त्यात दोघा जणांना जीवही गमवावा लागला होता एवढी मोठी दुर्घटना घडून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील तुटलेले संरक्षक कठडे काढून नवीन कठडे बसविण्याची तसदी सुद्धा घेतली नाही. जोर्वे ते पिंपरने जाणार्‍या रस्त्यावरील प्रवरा नदीच्या पुलावर पडलेल्या भगदाड मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी नवीन शक्कल लढवित जेसीबीच्या साह्याने पुलाच्या पायाजवळ वाळूचा भरावा केला. पडलेल्या भगदाडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात विटांचा भराव केला आहे. मात्र नदीला पाणी आल्यानंतर भरावा वाहून जाणार आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सार्वजनिक विभागाने तात्काळ पुलावर पडलेले भगदाड दुरुस्त करावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांसह वाहनचालकांनी केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news