राजस्‍थानमध्‍ये क्रौर्याची परिसीमा! सामूहिक बलात्‍कारानंतर अल्‍पवयीन मुलीला कोळशाच्‍या भट्टीत फेकले

 भिलवाडा येथे पाहणी करताना कोटरी पोलीस ठाण्याच्या कर्मचारी.
भिलवाडा येथे पाहणी करताना कोटरी पोलीस ठाण्याच्या कर्मचारी.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थानमधील (Rajasthan) भिलवाडा येथील एक भयंकर आणि मानवतेला काळीमा फासणारी घडना उजेडात आली आहे. येथे १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्‍कारानंतर ( Gangrape) तिला कोळशाच्‍या भट्टीत ( coal furnace ) फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेपत्ता होण्यापूर्वी तिने घातलेल्या चांदीच्या बांगड्या आणि चप्पलच्या जोडीवरून तिची ओळख पटली. भिलवाडा येथील कोटरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात बुधवारी रात्री ही संतापजनक घटना उघडकीस आल्‍याचे वृत्त 'फस्‍ट पोस्‍ट'ने दिले आहे.

पीडितेच्या मोठ्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी बुधवारी सकाळी आठ वाजता शेळ्या घेऊन घरातून निघाली होती. नेहमी ती दुपारी घरी येत असे मात्र दुपारी ३ वाजेपर्यंत ती परतली नाही. चिंताग्रस्त नातेवाईकांची घरे व शेतात जाऊन शोधाशोध सुरू केली. पण, तिचा शोध लागला नाही.

रात्री आठच्या सुमारास कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी बेपत्ता मुलीचा शोध पुन्हा सुरू केला. याच वेळी त्यांना गावाबाहेरील काळबेलींच्या छावणीत कोळशाची भट्टी काही तरी जळत असल्याचे दिसले. साधारणपणे पावसाळी वातावरणात भट्टी पेटत नाही. चुलीजवळ मुलीचे जोडे, चांदीचे ब्रेसलेट आणि हाडांचे तुकडे आगीत सापडल्याने त्यांचा संशय बळावला.गावकऱ्यांनी काही व्यक्तींना तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तीन संशयितांना अटक केली.चौकशीदरम्यान आरोपींनी सामूहिक बलात्कार आणि जाळण्याच्या घटनेची कबुली दिली आहे. त्याच रात्री फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.

चौकशीसाठी भाजपने स्‍थापन केली समिती

राजस्थान भाजपने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. यामध्‍ये आमदार अनिता भदेल, महिला मोर्चाच्या अध्यक्षा रक्षा भंडारी, माजी आमदार अतारसिंह भदाना यांचा समावेश आहे.राज्यमंत्री धीरज गुर्जर यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडितेच्या नातेवाईकांकडून घटनेची माहिती घेतली. या भयंकर घटनेचा त्‍यांनी शब्दांमध्‍ये निषेध केला असून दोषींवर त्वरीत आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news