११७ वर्षांत भारताच्या सरासरी तापमानात ०.७ अंश सेल्सियसची वाढ : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती | पुढारी

११७ वर्षांत भारताच्या सरासरी तापमानात ०.७ अंश सेल्सियसची वाढ : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जगभरात जागतिक तापमान वाढीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. भारताला देखील या समस्येचा फटका बसतो आहे. दशकभरात देशातील सरासरी तापमानात वाढ झाली आहे.१९०१ ते २०१८ या ११७ वर्षांमध्ये भारताच्या सरासरी तापमानात ०.७ अंश सेल्सियने वाढ झाली,अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत एका लिखित उत्तराद्वारे दिली. (India’s temperature)

India’s temperature : दुष्काळाची क्षेत्रीय व्याप्तीत वाढ

रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनूसार १९५० ते २०१५ या ६५ वर्षांमध्ये दैनंदिन पर्जन्यमान अतिप्रमाणत होण्याची वारंवारता जवळपास ७५ टक्क्यांनी वाढली.तर, १९५१ ते २०१५ या काळात दुष्काळाची वारंवारता आणि दुष्काळाची क्षेत्रीय व्याप्तीत वाढ झाल्याचे देखील केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

१९९३ ते २०१७ या अडीच दशकांमध्ये दक्षिण हिंदी महासागराची समुद्र पातळी वर्षाकाठी ३.३ मिलिमीटर वेगाने वाढत आहे. शिवाय १९९८ ते २०१८ दरम्यान पावसाळ्यानंतर अरबी समुद्रात भयंकर चक्रीवादळ येण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती केंद्रीय पृथ्वाी विज्ञान मंत्रालयाच्या (एमओईएस) २०२० मधील भारतीय भूप्रदेशात झालेल्या हवामान बदलाचे मूल्यमापन या अहवालाचा दाखला देत रिजिजू यांनी त्यांच्या उत्तरातून दिली.

हेही वाचा : 

 

 

Back to top button