नूह हिंसाचाराची झळ महिला न्‍यायाधीशांना! चिमुरडीसह अनुभवला जीवघेणा थरार | पुढारी

नूह हिंसाचाराची झळ महिला न्‍यायाधीशांना! चिमुरडीसह अनुभवला जीवघेणा थरार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नूह येथील हिंसाचारानंतर हरियाणातील तणाव कायम आहे. मागील दोन दिवस हरियाणातील विविध जिल्‍ह्यात हिंसाराचाी धग पोहचली आहे. नूहमधील उसळलेल्‍या दंगलीची झळ महिला न्‍यायाधीशांना बसल्‍याची माहिती उजेडात आली आहे. जमावाने त्‍यांची कार पेटवली. जमावाच्‍या तावडीतून त्‍यांच्‍यासह त्‍यांची तीन वर्षांची मुलगी थोडक्‍यात बचावल्‍या आहेत. ( Haryana Nuh Violence )

Haryana Nuh Violence : नेमकं काय घडलं?

नूहच्‍या अतिरिक्‍त मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी अंजली जैन आपल्‍या तीन वर्षांच्‍या मुलीसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून घरी जात होत्‍या. त्‍याचवेळी दंगळ उसळली. कारमध्‍ये न्यायाधीश अंजली जैन यांच्‍यासोबत त्यांचा गनर, ड्रायव्हरही, मदतनीस टेकचंद होते.

Haryana Nuh Violence : वर्कशॉपमध्ये लपून जीव वाचवला

या घटनेची माहिती देताना टेकचंद म्हणाले, ‘आम्ही नल्हार येथील रुग्णालयातून घरी परत जात होतो. यावेळी अचानक १०० ते १५० लोकांचा जमाव रस्त्यावर दिसेल ते वाहन जाळत असल्‍याचे दिसले. तसेच तुफान दगडफेकही होत होती. आमच्या कारला दगड लागला. कारची मागील काच फुटली. यावेळी जमावातील काही जण गोळीबारही करत होते. गोळीबाराचा आवाज ऐकून आम्ही घाबरलो. बेफाम झालेला जमावाने आमच्‍या कारवर चाल केली. सर्वांनी कार जागेवर सोडून पळ काढला. यानंतर त्यांनी दिल्ली-अलवर मार्गावरील हरियाणा रोडवेजच्या जुन्या वर्कशॉपमध्ये आश्रय घेतला.

जमावाने कार पेटवली

परिस्थिती सामान्य न्‍यायाधीश अंजली जैन यांनी या घटनेची माहिती स्थानिक वकिलांना दिली. वर्कशॉपमधून बाहेर आल्‍यानंतर जमावाने जाळलेली कार त्‍यांच्‍या निदर्शनास आले. ही न्‍यायाधीशांची खासगी कार होती. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्‍हा दाखल केला आहे.

नुह येथील परिस्थिती सध्या शांत असली तरी परिस्थिती तणावपूर्ण आहे. हिंसाचार पुन्हा भडकू नये यासाठी निम्‍नलष्‍करी दलास पाचारण करण्‍यात आले आहे. येथील इंटरनेट बंदी 5 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा :

 

Back to top button