Yamuna River : यमुना नदीचे पाणी पुन्हा धोकादायक पातळीच्या वर

Yamuna River Delhi
Yamuna River Delhi
Published on
Updated on
पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : उत्तर भारतात पुन्हा एकदा पावसाचे थैमान सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीत यमुना नदीचे पाणी धोकादायक पातळीच्या वर गेले आहे. दरम्यान सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने मदत आणि पुनर्वसन कामात अडथळे येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. (Yamuna River)
हिमाचल, उत्तराखंड, हरियाणा आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे यमुना नदीची पाणी पातळी वाढली आहे. रविवारी सकाळी यमुनेची पाणी पातळी 205.75 मीटरवर होती. यापेक्षा पाणी वाढले तर दिल्लीत पुन्हा पूर येऊ शकतो. हथीनी कुंडातून सातत्याने पाणी सोडले जात असल्याने नदीची पाणी पातळी 206.7 मीटरपर्यंत जाऊ शकते, असे दिल्ली सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान हिंडन नदीलाही पूर आल्याने नोएडा येथे काही भागात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.
हरियाणातील हथीनी कुंडातून सोडले जाणारे पाणी सुमारे 36 तासाने दिल्लीपर्यंत पोहोचते. कुंडातून दोन लाख क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याने दिल्लीत दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. लोकांच्या सुरक्षेचे उपाय योजले जात असल्याचे महसूल मंत्री अतिशी यांनी सांगितले. पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली तर मदत आणि पुनर्वसन कामात अडथळे येऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news