Oppenheimer Box Office Collection : ‘ओपनहायमर’ सुसाट, रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी 30 कोटींची कमाई | पुढारी

Oppenheimer Box Office Collection : ‘ओपनहायमर’ सुसाट, रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी 30 कोटींची कमाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : Oppenheimer Box Office Collection : प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा बहुचर्चित ओपेनहायमर हा हॉलिवूडपट या आठवड्यात प्रदर्शित झाला असून त्याने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत खळबळ उडवून दिली आहे. हा चित्रपट रिलीज होण्याआधीपासूनच त्याची कथा आणि ॲडव्हान्स बुकिंगमुळे चर्चेत राहिला. चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर तर पहिल्याच दिवशीच कमाईचा विक्रम केला. त्यामुळे पहिल्या शो पासूनच हा चित्रपट सुपरहिट झाल्याची चर्चा रंगली. दरम्यान, ओपेनहायमरच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचा तपशील समोर आला आहे.

बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचनिकच्या सुरुवातीच्या आकड्यांनुसार, ओपेनहाइमरने दुसऱ्या दिवशी 17.00 कोटींची कमाई केली असून, पहिल्या दिवशीच्या मानाने 15 टक्क्यांची वाढ घेतली आहे. त्यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 31.50 कोटींवर गेले आहे.

पहिल्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर, ओपनहायमरने 14.50 कोटींची कमाई केली. ज्यामध्ये इंग्रजी भाषेत 12.75 कोटी आणि हिंदीमध्ये केवळ 1.75 कोटी कमाई केली. दुसरीकडे, त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपट बार्बीने पहिल्या दिवशी 5 कोटींची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी 6.50 कोटींची कमाई केली.

विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर आजकाल बॉलीवूड चित्रपटांचा नाही तर हॉलिवूड चित्रपटांचा दबदबा आहे. मात्र, सत्यप्रेम की कथा आणि कॅरी ऑन जट्टा 3 सातत्याने कमाई करत आहेत.

Back to top button