विरोधी आघाडीच्या बैठकीत २४ पक्ष सामील होणार, आठ नवीन पक्षांचा समावेश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : बंगळुरु येथे येत्या १७-१८ जुलै रोजी होणाऱ्या विरोधी आघाडीच्या बैठकीस २४ विरोधी पक्ष सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चितपट करण्याचे उद्दिष्ट ठेवत विरोधी आघाडी मजबूत करण्यासाठी संयुक्त जद नेते नितीश कुमार तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलि्लकार्जुन खर्गे यांनी पुढाकार घेतलेला आहे.
( Opposition meet )
विरोधी आघाडीच्या पाटणा येथे झालेल्या पहिल्या बैठकीस १६ पक्ष उपस्थित राहिले होते. तर बंगळुरु येथे होणाऱ्या बैठकीत ८ नवीन पक्ष सामील होणार आहेत. नवीन पक्षांमध्ये तामिळनाडूतील एमडीएमके, केडीएमके, व्हीसीके तसेच आरएसपी यांचा समावेश आहे. याशिवाय ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, आययुएमएल, केरळ काँग्रेस (जोसेफ) आणि केरळ काँग्रेस ( मणी ) हेही सामील होणार आहेत. विशेष म्हणजे बैठकीस काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही उपस्थिती असणार आहे. ( Opposition meet )
नवीन पक्ष विरोधी आघाडीच्या बैठकीस हजर राहणार आहेत, त्यातील एमडीएमके व केडीएमके यांनी याआधीची लोकसभा निवडणूक भाजपच्या सोबतीने लढली होती. बंगळुरु बैठकीसाठीचे निमंत्रण पत्र याआधीच खर्गे यांनी विरोधी नेत्यांना पाठविलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा :
- Anil Ambani | अनिल अंबानींची संरक्षण कंपनीही दिवाळखोरीत! राफेलचे काय होणार?
- अतिवृष्टीचा ‘प्रकाेप’ : उत्तर भारतातील बळींची संख्या १०० हून अधिक, हिमाचलमध्ये पुन्हा रेड अलर्ट
- SBI Data leaked | चिंताजनक! १२ हजारांहून अधिक SBI कर्मचाऱ्यांचा टेलिग्रामवरून डेटा लीक