विरोधकांच्‍या ‘एकजुटी’साठी सोनिया गांधी सरसावल्‍या, बंगळूर येथील बैठकीला राहणार उपस्‍थित | पुढारी

विरोधकांच्‍या 'एकजुटी'साठी सोनिया गांधी सरसावल्‍या, बंगळूर येथील बैठकीला राहणार उपस्‍थित

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भाजप विरोधकांची एकजुटीसाठी आता काँग्रेसच्‍या माजी अध्‍यक्षा सोनिया गांधी ( Sonia Gandhi )  सरसावल्‍या आहेत. १७ आणि १८ जुलै रोजी बंगळूर येथे होणार्‍या विरोधी पक्ष नेत्‍यांच्‍या बैठकीला त्‍या उपस्‍थित राहणार असल्‍याची वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. २०२४ मध्‍ये होणार्‍या लोकसभा निवडणुकी संदर्भात विरोधी पक्षांची पहिली बैठकी २३ जून रोजी बिहारमधील पाटणा येथे झाली होती. नुकत्‍याच झालेल्‍या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले आहे.

विरोधी पक्षांची १७ आणि १८ जुलै रोजी बंगळूर येथे बैठक हाेणार आहे. यामध्‍ये २४ भाजपविराेधी राजकीय पक्ष सहभागी होण्‍याची शक्‍यता अहे. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीवर औपचारिक संवाद होईल. या बैठकीत विरोधी पक्षांमधील व्यापक सहमतीच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. या बैठकीला काँग्रेसच्‍या माजी अध्‍यक्षा सोनिया गांधी उपस्‍थित राहणार असल्‍याचे सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे.

पाटणा येथील त्या पहिल्या बैठकीत विरोधी पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकजुटीने सामोरे जाण्याचा निर्धार केला होता. मात्र आम आदमी पक्षामध्ये अशा कोणत्याही मेळाव्याचा भाग बनणे कठीण जाईल, असे स्‍पष्‍ट केले होते. पाटणा बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांनी लवचिक दृष्टिकोन ठेवून आपले मतभेद बाजूला ठेवून समान अजेंडा आणि राज्यनिहाय रणनीतीवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा : 

 

Back to top button