जम्मू काश्मीरमध्ये लवकर निवडणुका घेण्याबाबतच्या याचिकांवरील सुनावणी लांबणीवर | पुढारी

जम्मू काश्मीरमध्ये लवकर निवडणुका घेण्याबाबतच्या याचिकांवरील सुनावणी लांबणीवर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जम्मू काश्मीरमध्ये लवकर निवडणुका घेण्याच्या विनंती याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. कलम 370 संदर्भातील याचिकांवर येत्या 11 तारखेला सुनावणी होणार आहे. ही सुनावणी पार पडल्यानंतर निवडणुका घेण्यासंदर्भातील याचिकांवर म्हणणे ऐकून घेतले जाईल, असेही सर्वोच्‍च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये लवकर निवडणुका घेतल्या जाव्यात, असे सांगत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यासह १३ अन्य पक्षांच्या नेत्यांनी गत मार्च महिन्यात निवडणूक आयोगात निवेदन दिले होते. दुसरीकडे निवडणुका लवकर घेण्याबाबतच्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

केंद्र सरकारने २०१९ साली जम्मू काश्मीरला प्राप्त असलेले कलम ३७० संपुष्टात आणले होते. त्याला आक्षेप घेत न्यायलयात असंख्य याचिका दाखल आहेत. या याचिकांवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ ११ तारखेला सुनावणी घेणार आहे. या सुनावणीनंतर निवडणुकाबाबतच्या याचिकेवर म्हणणे ऐकून घेतले जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button