Maharashtra Politics : खातेवाटप लवकरच होईल - उदय सामंत | पुढारी

Maharashtra Politics : खातेवाटप लवकरच होईल - उदय सामंत

पुढारी ऑनलाइन डेस्क : Maharashtra Politics : अजित पवार आपल्या 35 ते 40 आमदारांचा पाठिंबा घेऊन रविवारी (दि 2) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणाला पुन्हा हादरे बसले. दरम्यान, अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने शिवसेना नाराज आहे. तसेच खातेवाटपावरून देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीत बिनसण्याची शक्यता आहे. या सर्व चर्चांवर तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. जाणून घ्या काय म्हणाले उदय सामंत…

शिंदे गटात अजित पवार यांच्या प्रवेशामुळे कोणतीही नाराजी नाही, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (दि5) राष्ट्रवादीच्या मेळाव्यात त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, हे स्पष्ट केले होते. तेव्हापासून अजित पवार हे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे. यावर उदय सामंत यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार ही चर्चा निरर्थक असल्याचेही त्यांनी म्हटले. तर लवकरच खातेवाटप होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा :

मोठ्या साहेबांचे छत्र सोडून आ. लंके दादांच्या छायेत..!

पुतण्याला सोडून पाथर्डीचे ‘काका’ काकांच्या मागे!

Back to top button