‘२० लाख कोटींच्या घोटाळ्याची हमी…’ : विरोधकांच्या बैठकीवर PM मोदींचा हल्‍लाबोल | पुढारी

'२० लाख कोटींच्या घोटाळ्याची हमी...' : विरोधकांच्या बैठकीवर PM मोदींचा हल्‍लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विरोधी पक्षातील बैठकीत सहभागी झालेले लोक २० लाख कोटी रुपयांच्‍या घोटाळ्याची हमी आहेत, अशा शब्‍दांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्‍ये नुकतेच झालेल्‍या विरोधी पक्षांच्‍या बैठकीवर हल्‍लाबोल केला. भोपाळमधील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ या अभियानात ते बोलत होते.

विरोधकांची बैठक म्‍हणजे भ्रष्‍टाचाराची गॅरंटी

बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी २३ जून रोजी १५ विरोधी पक्ष नेत्‍यांची बैठक बोलवली होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, आजकाल एक नवीन शब्द लोकप्रिय होत आहे, हा शब्द ‘गॅरंटी’ असा आहे. आता ही हमी भ्रष्टाचाराबाबत आहे हे नागरिकांना सांगण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांची आहे. लाखो कोटींच्या घोटाळ्याची ही हमी आहे,”

फोटो पाहा तुमच्‍या लक्ष्‍यात येईल प्रत्‍येक व्‍यक्‍ती म्‍हणजे घोटाळ्याची हमी

“काही दिवसांपूर्वी त्यांच्या (विरोधी पक्ष नेत्‍यांचा) एक कार्यक्रम आयोजित केला होता. फोटो पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की फोटोतील प्रत्येक व्यक्ती २० लाख कोटी रुपयांच्या (20,000 अब्ज) घोटाळ्याची हमी आहे. एकट्या काँग्रेसने लाखो कोटींचे घोटाळे केले आहेत, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्‍हणाले.

प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाई ही आमची हमी

ही लोकांना फक्त त्यांच्या पक्षाचा फायदाच करायचा असतो. भ्रष्टाचार, कमिशन आणि कपात केलेल्या पैशातून वाटा मिळतो म्हणून ते असे करतात. त्यांना कष्ट करावे लागत नाहीत म्हणून त्यांनी हा मार्ग निवडला आहे. या पक्षांना फक्त घोटाळ्यांचा अनुभव आहे, आणि त्यांच्याकडे फक्त एकच हमी आहे ती म्‍हणजे घोटाळ्यांची आहे. ही हमी स्वीकारायची की नाही हे देशाने ठरवायचे आहे. प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाई ही आमची हमी आहे, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : 

 

Back to top button