पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

मडगाव; दीपक शिंगण : गेल्या अनेक दिवसांपासून असलेली मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची प्रतीक्षा अखेर मंगळवारी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या एक्सप्रेससह देशभरात विविध मार्गांवर धावणाऱ्या इतर चार वंदे एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवून त्यांचे उद्घाटन केले.

गोव्यातील मडगाव स्थानकावरील वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. तर मडगाव रेल्वे स्थानकावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिरवा झेंडा दाखवून मुंबईच्या दिशेने रवाना केले.
यावेळी गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरण पिल्लई, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, महाराष्ट्राचे मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री व मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत, कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आदी उपस्थित होते.

मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक :

नॉन मान्सून वेळापत्रक :
22229/22230 मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (आठवड्याचे 6 दिवस) शुक्रवार वगळता.
22229 सीएसएमटी मुंबईहून 5.25 वाजता निघेल आणि मडगावला 13.10 वाजता पोहोचेल.
22230 मडगावहून 14.40 वाजता निघेल आणि 22.25 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.
मान्सून वेळापत्रक :
22229/22230 मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक)
22229 दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 5.25 वाजता सीएसएमटी मुंबईहून निघेल आणि मडगावला 15.30 वाजता पोहोचेल.
22230 मडगावहून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी 12.20 वाजता सुटेल आणि 22.25 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.
थांबे : दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम.

हेही वाचा : 

Back to top button