Massive House Fire In Delhi : आगीच्‍या धुराने श्‍वास कोंडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्‍यू | पुढारी

Massive House Fire In Delhi : आगीच्‍या धुराने श्‍वास कोंडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्‍यू

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

दिल्लीतील ओल्ड सीमापुरी भागात सोमवारी मध्यरात्री एका घराला लागलेल्या आगीने ( Massive House Fire In Delhi ) एकाच कुटुंबातील चार लोकांचा बळी घेतला. तीन मजली इमारतीला लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट निर्माण झाले होते. या धुराने श्वास कोंडून होरीलाल नावाच्या इसमासह त्याच्या कुटुंबातील अन्य तीन लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी प्रयत्नांची शिकस्त करुन आग विझवली.

डास येऊन नयेत, यासाठी लावलेल्या कॉईलमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा संशय ( Massive House Fire In Delhi ) पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. होरीलाल हा शास्त्री भवनमध्ये नोकरीला होता. दरम्यान राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील खोडा कॉलनीमध्येही एका घराला आग लागली होती. सदर तीन मजली घरामध्ये चिप्स आणि मिठाई पदार्थ बनविले जात होते. घरात गॅस सिलेंडर आणि मोठ्या प्रमाणावर तेल साठविण्यात आले होते. आगीदरम्यान गॅस सिलेंडर फुटल्याने घराचे छप्पर उडून गेले होते तर तेलाचे बॅरल फुटून तेल गल्लीमध्ये पसरले होते. या दुर्घटनेने  एकाच कुटुंबातील चार लोकांचा बळी घेतला.

दिल्लीतील ओल्ड सीमापुरी भागात सोमवारी मध्यरात्री एका घराला लागलेल्या आगीने

हेही वाचलं का?

Back to top button