Adani Hindenburg Row : अदानी समुहाच्या शेअर्समध्ये पुन्हा मोठी घसरण; अमेरिकेतील गुंतवणूकदारांची चौकशी | पुढारी

Adani Hindenburg Row : अदानी समुहाच्या शेअर्समध्ये पुन्हा मोठी घसरण; अमेरिकेतील गुंतवणूकदारांची चौकशी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अदानी ग्रुपचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर (Hindenburg Research report) प्रचंड तोटा सहन करत असलेला अदानी समूह (Adani Group) आता आणखी नव्या एका अडचणीत सापडला आहे. शुक्रवारी अदानी समुहाचे शअर्स (Adani Group Shares) १० टक्क्यांपर्यंत घसरले. खरेतर, आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये चालू असलेल्या वृत्तानुसार, अदानी समूहाने अमेरिकन गुंतवणूकदारांना (American investors) दिलेल्या प्रतिनिधित्वाची चौकशी तेथील नियामकांकडून (US Regulatory Authorities) सुरू करण्यात आली आहे. (Adani Hindenburg Row)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिंडेनबर्ग रिसर्चने शेअर्स किमतीत फेरफार केल्याच्या आरोपानंतर अमेरिकन अधिकारी अदानी समूहाने अमेरिकन गुंतवणूकदारांना प्रतिनिधित्वांची चौकशी करत आहेत. या चौकशीचा परिणाम अदानी ग्रुप्सच्या शेअर्सवर झाल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले. ज्यामध्ये अदानी पोर्टस्, अदानी पावर, अदानी ट्रान्समिशनमध्ये ५ टक्क्यांची घसरण आणि अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी विल्मर यांच्या शेअर्समध्येही ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. (Adani Hindenburg Row)

सूत्रांच्या माहितीनुसार ब्रुकलिनमधील यूएस अॅटर्नीचे कार्यालय आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (एसईसी) यांनी अदानी समूहाशी संबंधित संस्थात्मक गुंतवणूकदारांना तपासाशी निगडीत प्रश्न विचारले आहेत. ज्यामध्ये अदानी समुहाने गुंतवणूकदारांसमोर काय भूमिका ठेवली याची विचारणा करण्यात आली आहे.

जरी गुंतवणूकदारांची चौकशी होत असली तरी यामध्ये कायदेशीर कारवाई होणार आहे अशी कोणतेही संकेत अद्याप मिळालेले नाहीत. पण, भारतात अदानी समूहाबाबत होत असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत होणारी ही चौकशी महत्त्वाची मानली जात आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्त्वाखालील अदानी समुहावर शेअर्समध्ये फेरफार आणि त्यांच्या अकाउंटमध्ये घोटाळा केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

अधिक वाचा :

Back to top button