Rahul Gandhi And Lalu Prasad Yadav : राहुल गांधींच्या लग्नाची विरोधकांना काळजी! वऱ्हाडी म्हणून मिरवायला लालूंना झाली घाई | पुढारी

Rahul Gandhi And Lalu Prasad Yadav : राहुल गांधींच्या लग्नाची विरोधकांना काळजी! वऱ्हाडी म्हणून मिरवायला लालूंना झाली घाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाटण्यातील भरलेल्या देशातील विरोधी पक्षांच्या महाबैठकीत फारसे काही निष्कर्ष निघाले नाहीत. मात्र विरोधी पक्षांच्या दिल्ली आराखड्याची ब्ल्यू प्रिंट निश्चितच तयार झाली आहे. आता १२ जुलै रोजी पाटणा येथे जमलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची शिमल्यात बैठक होणार असून तेथून ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची योजना आखणार आहेत. (Rahul Gandhi And Lalu Prasad Yadav)

दरम्यान, पाटण्यात झालेल्या सभेत अनेक रंजक गोष्टी सुद्धा पाहायला मिळाल्या. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण बैठकीत लालू यादव यांचे राजकीय पुनरागमन दिसून आले. या राजकीय बैठकीत त्यांनी औपचारिक सहभाग घेतला. दुसरे म्हणजे या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली तेव्हा लालू प्रसाद आपल्या जुन्या अंदाजात परत येत जणू मैफिलच रंगवली. (Rahul Gandhi And Lalu Prasad Yadav)

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांचे काय स्थान आहे हे सर्वश्रुत आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीवेळी लालू प्रसाद यांच्या बाजूला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मग त्यांच्या बाजूला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खरगेंच्या बाजूला काँग्रेसचे नेते राहुल गांधी बसेल होते. राहुल यांच्या शेजारी इतर पक्षांचे नेते क्रमावर बसले होते. यावरुनच लालू प्रसाद यांचे आजही काय महत्त्व आहे हे स्पष्ट होते. (Rahul Gandhi And Lalu Prasad Yadav)

लालू प्रसाद जुन्या अंदाजात परतले (Rahul Gandhi And Lalu Prasad Yadav)

यावेळी लालू यादव फॉर्ममध्ये व त्यांच्या जुन्या रुपात परत आल्याचे दिसले. एक वेळ अशीही आली जेव्हा लालू प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांच्याच शैलीत टोलेबाजी केली. मोदींन नंतर लालू प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत थेट त्यांचा सहयोगी पक्ष असणाऱ्या काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनाच घेरत थेट त्यांना त्यांच्या लग्नाबद्दल बोलायला सुरुवात केली. मग काय, लोकांनीही या क्षणाचा चांगलाच आनंद लुटला. यावेळी राहुल यांच्या लग्नाबाबत लालू यांनी केलेली टिप्पणी ऐकूण खुद्द मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सुद्धा हासू आवरेना अशी वेळ आली होती. संपूर्ण सभागृहाने लालू प्रसाद आणि राहुल गांधी यांच्यातील संवादाच्या हास्यमैफिलीचा आनंद लुटला.

राहुल गांधी नकळत लाजले

वास्तविक, लालू सतत राहुल गांधींच्या लग्नाबद्दल बोलत राहिले आणि अनेकवेळा राहुल गांधी नकळत लाजताना सुद्धा दिसले. आता तुम्हाला लग्न करावेच लागेल, असे लालू यादव म्हणाले. यावर राहुल गांधी म्हणाले की, आई म्हणाली तर मी करेन. तेव्हा लालू यादव म्हणाले की, तुमच्या आईनेच मला सांगितले आहे, की तुम्ही त्यांचे ऐकत नाही. आता तुम्हाला लग्न करावं लागेल. तुमची आई म्हणते तुम्ही लग्न करण्यास तयार नाही म्हणून, पण आता तुम्हाला या वेळी नक्कीच लग्न करावे लागेल.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे कौतुक

याच मुद्द्याला पुढे नेत राहुल गांधी पुन्हा उल्लेख करत लालू प्रसाद यादव म्हणाले, राहुल गांधी यांनी आलिकडे चांगले काम केले आहे. त्यांनी पायी चालत संपूर्ण भारताला भेट दिली. पुढे ते गंमतीने म्हणाले,‘ या दरम्यान त्यांनी दाढी वाढवली होती, आता राहुल गांधींचा उल्लेख करत लालू प्रसाद यादव म्हणाले की, राहुल गांधींनी आजकाल चांगले काम केले आहे. पायी भारताला भेट दिली. या संपूर्ण प्रवासादरम्यान टी शर्ट घातला असे म्हणत ५३ वर्षांच्या राहुल गांधींचे विशेष कौतुक केले. पण, तुम्ही लग्न करत नाही म्हणून तुमच्या आईंना चिंता लागून राहिली आहे. तुम्ही आमच्या लग्न करण्याच्या सल्ल्यावर लक्ष द्या अशी लालूंनी यावेळी राहुल गांधींना विनंती केली. यावेळी लालू गंमतीने म्हणाले की, ‘ती उरली सुरली दाढी काढा आणि लग्न करा, आम्हाला तुमच्या लग्नात वऱ्हाडी व्हायचे आहे. या लालुंच्या वक्तव्यांने सभागृत एकच हशा पिकला.


अधिक वाचा :

Back to top button