Weather Forecast | मान्सून दाखल होण्यापूर्वी राज्यात तापमान वाढणार; IMD ची माहिती

Weather Forecast | मान्सून दाखल होण्यापूर्वी राज्यात तापमान वाढणार; IMD ची माहिती

पुढारी ऑनलाईन : कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी (दि.८ जून) मान्सून केरळात दाखल झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. परंतु महाराष्ट्रात मान्सून कधी पोहचणार याबबत हवामान विभागाकडून कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. दरम्यान मान्सूनच्या आगमनापूर्वी राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून आज (दि.०९ जून) ट्विटरवरून दिलेल्या माहितीत वर्तवण्यात आली आहे. (Weather Forecast)

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीत, मान्सूनच्या आगमनापर्यंत येत्या काही दिवसांसाठी कमाल तापमानात वाढ होणार आहे. यामध्ये महराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागातील तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (Weather Forecast)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news