पुणे; पुढारी वृत्तसंवा : हुश्श.. एकदाची प्रतीक्षा संपली मान्सून केरळात आल्याचे वृत्त हवामान विभागाने दुपारी 1 वाजता जाहीर केले अन् आनंदाची लहर देशात निर्माण झाली. 1 जूनला येणारा मान्सून 7 दिवस उशिरा आला आहे. आता महाराष्ट्रात येण्यास किमान सात दिवस लागतील. 12 ते 15 जूनच्या दरम्यान तो राज्यात येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बिपोर जॉय चक्रीवादळाची निर्मिती होताच लक्षद्वीपमध्ये अडखलेल्या मान्सूनला गती मिळाली, आणि 9 रोजी येणारा मान्सून 24 तास आधीच सर्वांचे अंदाज चुकवत 8 जून रोजी दुपारी 12.30 वाजता केरळमध्ये दाखल झाला.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार तो 9 रोजी येणार होता पण तो 8 जून रोजी सकाळी केरळ किनारपट्टीवर धडकला तेथे जोरदार पाऊस सुरू झाला असुन केरळसह तो दक्षिण तामीळनाडू किनारपट्टीवर देखील आला आंहे. आगामी 24 तासांत तो संपूर्ण अरबीसमुद्रात, तामिळनाडू, म्यानमार सह बंगालच्या उपसागरातही प्रगती करणार आहे.
चक्रीवादलामुळे मान्सूनचा प्रवास जोरदार सुरू आसून तो तळकोकणात 12 जून तर उर्वरित महाराष्ट्रात 15 जून पर्यन्त येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा