Monsoon Update | अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, ४८ तासांत कर्नाटकात येणार | पुढारी

Monsoon Update | अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, ४८ तासांत कर्नाटकात येणार

पुढारी ऑनलाईन : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून आज ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला. मान्सूनची केरळमध्ये येण्याची सामान्य तारीख १ जून आहे. पण आठ दिवस उशिराने केरळमध्ये त्याचे आगमन झाले आहे. मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप परिसर, केरळचा बहुतांश भाग, दक्षिण तामिळनाडूचा बहुतांश भाग, कोमोरिन क्षेत्राचा उर्वरित भाग आणि नैऋत्य, मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आज, ८ जून रोजी व्यापला आहे. (Monsoon Update)

पुढील ४८ तासांत मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटकचा काही भाग आणि नैऋत्य, मध्य आणि ईशान्य बंगालचा उपसागर आणि ईशान्येतील काही राज्यांत पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

गेल्या २४ तासांत पासून केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. केरळच्या किनारपट्टीवर ४ जून रोजी मान्सून धडकू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी वर्तविला होता. मागील दोन वर्षांचा विचार केला तर मान्सूनचे २०२० साली १ जून रोजी, २०२१ साली ३ जून रोजी तर २०२२ साली २९ मे रोजी आगमन झाले होते. (Monsoon Update)

हे ही वाचा :

Back to top button