Unknown number : अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून आलेले कॉल घेऊ नका; मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आवाहन | पुढारी

Unknown number : अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून आलेले कॉल घेऊ नका; मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आवाहन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारतात ऑनलाईन फसवणूक प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे. अज्ञात आंतरराष्ट्रीय नंबरवरुन अनेकांना संदेश आणि कॉल येत असल्याच्या घटना पहायला मिळत आहे. यामध्ये व्हॉट्सअप या मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून फ्रॉड कॉल्सचे प्रमाण अधिक वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Telecom Minister Ashwini Vaishnav) यांनी भारतीय नागरिकांना अनोळखी नंबरवरुन (Unknown number) येणारे फोन कॉल उचलू नयेत असे आवाहन केले आहे.

केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पॅम कॉल आणि सायबर फसवणुकीबाबत (spam calls and cyber frauds) सतर्क राहण्यासाठी ‘संचार साथी’ (Sanchar Saathi) हे पोर्टल सुरु केले आहे. त्यांनी नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार, केवळ अशाच फोन कॉल्सना प्रतिसाद द्या जे नंबर तुम्ही ओळखता. तसेच ते असे देखील म्हणाले की, मंत्रालयाद्वारा केलेल्या उपाय योजनांमुळे सायबर फसवणूकीच्या घटनांमध्ये उल्लेखनीय घट झाली आहे.

एजंट्स ब्लॉक लिस्टमध्ये | Cyber Fraud Case

मंत्री वैष्णव म्हणाले की, लोकांनी अनोळखी नंबर वरुन येणाऱ्या कॉल्सना (Fake phone call) प्रतिसाद देऊ नये. मी देशातील प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की, फक्त त्याच नंबर्सना प्रतिसाद द्या ज्यांना तुम्ही ओळखता. अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पॅम कॉल आणि सायबर फसवणूक घटनांना प्रतिरोध करण्यासाठी दूरसंचार मंत्रालयाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ‘संचार साथी’ या पोर्टल द्वारे अशी प्रकरणे हाताळली जाणार आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून ४० लाखहून अधिक ४१ हजार चुकीच्या ‘पॉईंट ऑफ सेल’ एजंट्सना ब्लॉक लिस्टमध्ये टाकल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा

Back to top button