"दिल्लीत जाऊन तुम्हीच बघा..." भारतातील लोकशाहीवर 'व्हाईट हाऊस'ची स्‍पष्‍टाेक्‍ती | पुढारी

"दिल्लीत जाऊन तुम्हीच बघा..." भारतातील लोकशाहीवर 'व्हाईट हाऊस'ची स्‍पष्‍टाेक्‍ती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसचे अध्‍यक्ष राहुल गांधी हे सध्‍या अमेरिकेच्‍या दौर्‍यावर आहेत. येथे विविध ठिकाणी
भाषणांमध्‍ये त्‍यांनी भारतीय लोकशाहीवर चिंता व्‍यक्‍त केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपती भवन व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी भारताच्या लोकशाहीशी ( India Democracy )  संबंधित प्रश्न उपस्थित केले होते. यावर व्हाईट हाऊसने ( White House ) एक निवेदन जारी करून भारतीय लोकशाहीवर व्‍यक्‍त केली जाणारी चिंता फेटाळली आहे.

White House : भारत एक जिंवत लाेकशाही असणारा देश

भारतीय लोकशाहीवर बोलताना अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे समन्‍वयक जॉन किर्बी म्हणाले की, ‘भारत एक जिंवत लोकशाही असणारा देश आहे. आम्हाला आशा आहे की, यापुढेही लोकशाही संस्थांच्या बळावर चर्चा सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा हे दोन्‍ही देशांमधील संबंध अधिक संबंध दृढ करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.”

पतंप्रधान मोदींच्‍या अमेरिका दौर्‍याची उत्‍सुकता

२१ ते २४ जून दरम्‍यान पंतप्रधान मोदी अमेरिका दौर्‍यावर जाणार आहेत. अमेरिकेतील संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार आणि इतर अनेक खासदार याबद्दल खूप उत्सुक आहेत. त्‍यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या निमंत्रण पत्रात लिहिले आहे की, अमेरिकेच्‍या संदसेच्‍या दोन्‍ही सभागृहांच्या वतीने 22 जून 2023 रोजी सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणे आमच्यासाठी सन्मानाची बाब असेल. केविन मॅककार्थी, सिनेटचे नेते चक शूमर, मिच मॅककॉनेल, हकीम जेफ्रीज यांच्याही आमंत्रणावर स्वाक्षरी आहे. अनेक अमेरिकन खासदार पंतप्रधान मोदींच्या सदनाला संबोधित करण्याबद्दल उत्सुक आहेत.

हेही वाचा :

 

 

Back to top button