

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशातील बालासोर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर, पूर्व आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या मुख्य 'ट्रंक लाईन' वरून रेल्वे डबे हटविण्यात आले आहेत. रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी दोन ट्रॅकची दुरुस्ती सुरू आहे. त्यातील एका रेल्वे मार्गाची दुरूस्ती पूर्ण झाल्याने रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे.
बालासोरमधील भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी दोन ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आली आहे. घटनेनंतर रेल्वेमंत्री सातत्याने घटनास्थळी उपस्थित होते. रविवारी एका मार्गावरील रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. मालगाडी निघून गेल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी प्रथम देवाचे आभार मानले आणि नंतर लोकांशी संवाद साधताना म्हणाले की, सर्वांनी खूप चांगले काम केले आहे. ज्या कुटुंबांचे लोक या दुर्घटनेत बळी पडले त्यांच्यासाठी मी खूप दु:खी आहे. मात्र या घटनेच्या मुळाशी जाणार आहोत. जो कोणी दोषी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. रेल्वे सेवा पुन्हा सुरू केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. दुसरी लाईनही लवकर सुरू करावी, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :