विदेशात कधीच राजकारण करत नाही : परराष्ट्रमंत्री जयशंकर | पुढारी

विदेशात कधीच राजकारण करत नाही : परराष्ट्रमंत्री जयशंकर

केपटाऊनः वृत्तसंस्था काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या अमेरिका दौर्‍यात भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्याबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. याबाबत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये प्रश्न विचारण्यात आला. यावर मंत्री जयशंकर म्हणाले, मी विदेशात जाऊन कोणत्याही प्रकारचे राजकारण करत नाही.

मी त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. मात्र भारतात परतल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देऊ. मंत्री जयशंकर हे सध्या बि—क्स परिषदेच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांनी मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मी विदेश दौर्‍यावर असतो त्यावेळी मी कधीच देशाबाबत राजकीय वक्तव्य करत नाही. मात्र, यावर भारतात चर्चा करण्यास तयार आहे.’

Back to top button