नागपूर, पुढारी वृत्तसेवा : चार मित्रांमध्ये झालेल्या जोरदार वादावादीचे रुपांतर हत्येत (Murder in nagapur) चार मित्रांमध्ये झालेल्या जोरदार वादावादीचे रुपांतर हत्येत झाल्याने गुरूवारी पुन्हा एकदा राज्याची उपराजधानी हादरली आहे. झाल्याने गुरूवारी पुन्हा एकदा राज्याची उपराजधानी हादरली आहे. नागपुरचा दिवस आज हत्येच्या घटनेनेच उजाडला, पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत सकाळी नऊ वाजताच्या सुमारास गोल्डी शंभरकर नावाच्या युवकाची चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
या प्रकरणी चार आरोपींची नावे समोर आली असून त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. आपसातील जुन्या वादामुळे ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. नागपूरच्या पाचपावली परिसरात सकाळच्या वेळी घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे चांगलीच खळबळ माजली आहे.
मृत गोल्डी शंभरकर आणि चार आरोपी हे मित्र होते, मात्र सकाळीच यांच्यामध्ये जुन्या वादावरुन भांडणं झाली. त्यानंतर गोल्डीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. मृत आणि आरोपी हे सगळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. २०१८ मध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
मात्र, या हत्येचं (Murder in nagapur) नेमकं कारण काय आणि कशावरुन त्यांच्यात वाद झाला हे आरोपींच्या अटकेनंतर स्पष्ट होईल. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करत चार आरोपींचा शोध सुरू केला आहे.नागपुरात गेल्या काही दिवसांमध्ये सतत हत्यासत्र सुरू असून यामुळे नागपुरात चांगलीच खळबळ माजली आहे. क्षुल्लक कारण असलं तरी भरदिवसा झालेल्या या हत्या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहा व्हिडीओ : अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती किरीट सोमय्यांना रामदास कदमांनी दिली ?