१०० कोटी नंबरचा कोरोना डोस घेणाऱ्या व्यक्तीवर पीएम मोदी नाराज | पुढारी

१०० कोटी नंबरचा कोरोना डोस घेणाऱ्या व्यक्तीवर पीएम मोदी नाराज

पुढारी ऑनलाईन डेस्क

आज गुरुवारी देशात १०० कोटी नंबरचा कोरोना डोस देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मनोहर लोहिया रुग्णालयात गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉक्टर, नर्सिंग स्टाफसह रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णालयात सगळीच खूष होते. पण यात मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज झाल्याचे दिसून आले. १०० कोटी नंबरचा डोस घेण्यासाठी ज्यावेळी एक व्यक्ती आली. त्यावेळी पंतप्रधानांनी या व्यक्तीला काही प्रश्न विचारले.

अरुण राय नावाच्या व्यक्तीने तो डोस घेतला. ज्यावेळी त्यांना लसीचा डोस दिला जात होता त्यावेळी पंतप्रधान मोदी त्यांच्याजवळ होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुण राय यांना लसीचा डोस पहिला घेतला आहे का दुसरा असे विचारले. यावेळी अरुण राय यांनी पहिला डोस असल्याचे सांगितले. पहिला डोस असल्याचे सांगितल्यावर पंतप्रधान मोदी नाराज झाले. याचवेळी पंतप्रधानांनी विचारले आतापर्यंत तुम्ही लस का घेतली नाही?

योगा करत होतो त्यामुळे वाटलं लसीची गरज नाही

पंतप्रधान मोदींच्या प्रश्नावर राय थोडावेळ थांबले आणि नंतर म्हणाले लसी विषयी थोडा भ्रम होता. मी योगा करतोय त्यामुळे लसीची गरज नाही अस वाटत होतं असही ते म्हणाले. पण ७० कोटी लोकांनी लस घेतली आहे. आणि पंतप्रधानांनीही लस घेतली आहे हे ऐकल्यावर मी लस घेण्याचा विचार केला. मी स्वत:ला भाग्यशाली समजतो की मी लस घेताना माझ्यासोबत देशाचे पंतप्रधान होते. असेही राय म्हणाले.
मोदींनी रुग्णालयातील लाभार्थ्यांशी, आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी व्हीलचेअरवरुन लसीकरण करण्यासाठी आलेल्या एका लाभार्थीला त्यांच्या आवडीबद्दल विचारले.

लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू

देशात कोविडविरोधी लसीकरण मोहिम या वर्षी १६ जानेवारीपासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. यानंतर, फ्रंटलाईन वर्करांचे लसीकरण २ फेब्रुवारीपासून सुरू झाले. लसीकरण मोहिमेचा पुढील टप्पा १ मार्चपासून सुरू झाला, यामध्ये ६० वर्षांवरील सर्व लोक आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे गंभीर आजार असलेले लोकांचे लसीकरण सुरू केले. देशातील ४५ वर्षांवरील सर्व लोकांचे कोविडविरोधी लसीकरण १ एप्रिलपासून आणि १८ वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण १ मे पासून सुरू झाले.

हेही वाचलत का?

 

Back to top button