Rail roko : पंजाब आणि हरियाणामधील ५० ठिकाणी रेल रोको | पुढारी

Rail roko : पंजाब आणि हरियाणामधील ५० ठिकाणी रेल रोको

रोहतक : पुढारी ऑनलाईन

संयुक्‍त किसान मोर्चाच्‍या वतीने देशव्‍यापी रेल रोको आंदोलन सुरु आहे. पंजाब आणि हरियाणामधील ५० ठिकाणी रेल रोको झाले. याचा परिणाम १३०हून अधिक रेल्‍वे स्‍थानकांवर झाला. फिरोजपूर ते अंबाला खंड या मार्गावरील ५० एक्‍सप्रेसला फटका बसला. उत्तर-पश्‍चिम रेल्‍वेसेवा विस्‍कळीत झाली.

लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकर्‍यांच्‍या मृत्‍यूप्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना अटक करण्‍यात यावी, या मागणीसाठी संयुक्‍त किसान मोर्चाने आज देशव्‍यापी सहा तास रोको रोको ( Rail roko ) आंदोलन करणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. उत्तर प्रदेशमधील रेल्‍वे वाहतूक सुरुळीत सुरु असल्‍याचे पोलिस महानिरीक्षक प्रशांत कुमार यांनी सांगितले. दरम्‍यान, उत्तर प्रदेशमधील हापुडा येथे शेतकरी आणि पोलिस अधिकार्‍यांमध्‍ये धक्‍काबुक्‍कीचा प्रकार घडला. यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पंजाब आणि हरियाणामधील ५० ठिकाणी रेल रोको झाले. याचा परिणाम १३०हून अधिक रेल्‍वे स्‍थानकांवर झाला. फिरोजपूर ते अंबाला खंड या मार्गावरील ५० एक्‍सप्रेसला फटका बसला. हरियाणामधील बहादूरगडमध्‍ये शेतकर्‍यांनी रेल रोको आंदोलन केले. आजमगड रेल्‍वे स्‍थानकावर आंदोलन करणार्‍या जय किसान आंदोलन संघटनेचे उपाध्‍यक्ष राजनिति यादव यांना पोलिसांनी त्‍यांच्‍या घरातच स्‍थानबद्‍ध केले आहे.

Rail roko : देशभरात आंदाेलनाची माहिती मिळावी यासाठी रेल राेकाे : टिकैत

संपूर्ण देशातील नागरिकांना हे आंदोलन का होतीय याची माहिती मिळावी, यासाठी हे आंदोलन केले जात आहे, अशी माहिती शेतकरी संयुक्‍त मोर्चाचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ता राकेश टिकैत यांनी दिली.

संयुक्‍त किसान मार्चाने रेल रोको( Rail roko ) आंदोलन शांततापूर्ण मार्गानेच होईल, असेही स्‍पष्‍ट केले आहे. या आंदोलनाच्‍या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्‍वे प्रशासन आणि पोलिसांनी तयारी केली आहे.

लखीमपूर खिरी येथे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा व सहकार्‍यांनी आंदोलक शेतकर्‍यांना कारने चिरडले. या घटनेत आठ शेतकर्‍यांचा मृत्‍यू झाला होता. याप्रकरणी आशिष मिश्रा याला अटक करण्‍यात आली आहे. या घटनेच्‍या निषेधार्थ संयुक्‍त किसान मोर्चा तर्फे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबमध्‍ये कलश यात्रा काढली जाणार आहे.

हेही वाचलं का ?

 

 

 

Back to top button