Karnataka Election Result 2023 Live : कर्नाटकात काँग्रेसला १३७ जागा? | पुढारी

Karnataka Election Result 2023 Live : कर्नाटकात काँग्रेसला १३७ जागा?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Karnataka Election Result 2023 Live : कर्नाटक निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. 11.30 वाजेपर्यंतच्या कल चाचण्यांमध्ये काँग्रेसने 119 जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यालयात जल्लोषाचे वातावरण आहे.  (Karnataka Election Results) मिळालेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार काँग्रेसने 119 जागांवर निर्णायक आघाडी घेतली असून भाजप 72 जागांवर आहे तर जेडीएस 25 जागांवर आहे. अद्ययावत माहितीनुसार धारवाडमधून काँग्रेसचे विनय कुलकर्णी विजयी झाले आहेत. तर बेळगाव उत्तर मतदारसंघातून नवव्या फेरीत काँग्रेसचे राजू शेठ ३१०७ मतांनी पुढे आहेत. पुढे निकालांचे लाइव्ह अपडेट्स दिले आहेत.

Live Update : 
  • काँग्रेस 101 जागांवर आघाडीवर असून 36 जागा जिंकल्या आहेत. तर भाजप 45 जागांवर आघाडीवर असून 17 जागा जिंकल्या आहेत.

विजापूर जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात

1) विजापूर शहर मतदारसंघ
बसवनगौडा पाटील भाजप 19625 पुढे

2) इंडी मतदारसंघ
काॅंग्रेस
यशवंतरावगौडा पाटील 23464

3) सिंदगी मतदारसंघ
अशोक मनगोळी काँग्रेस 25062

4) बबलेश्वर मतदारसंघ
एम बी पाटील काॅंग्रेस 20746 पुढे

5) मुद्धेबिहाळ मतदारसंघ आप्पाजी नाडगौडा काँग्रेस 27549पुढे

6) देवरहिप्परगी मतदारसंघ
राजूगौडा पाटील निजद 16875पुढे

7) बसवनबागेवाडी मतदारसंघ
अप्पूगौडा पाटील मनगोळी निजद 11343 पुढे

8) नागठाण मतदारसंघ
विठ्ठल कटकदोड काॅंग्रेस 12875 पुढे

  • धारवाडमधून काँग्रेसचे विनय कुलकर्णी विजयी
  • बेळगाव उत्तर मतदारसंघातून नव्या फेरीत काँग्रेसचे राजु शेठ तीन हजार एकशे सात मतांनी पुढे

 

  • बेळगाव निवडणूक निकाल छायाचित्रे

  • आठवी फेरी; बेळगाव ग्रामीण; लक्ष्मी हेब्बा : 28126; आर एम चौगुले : 18945
  • सातवी फेरी; बेळगाव ग्रामीण, लक्ष्मी हेब्बा : 2३५८९; आर एम चौगुले : १६४६२
  • निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस 119 जागांवर, भाजप 72 जागांवर आणि जेडीएस 25 जागांवर आघाडीवर आहे.

  • कागवाड मधून आठव्या फेरीत राजू कागे 7669 मतांनी आघाडीवर.
  • खानापुरातून विठ्ठल हलगेकर सतरा हजार मतांनी पुढे.
  • बेळगाव दक्षिण मतदार संघातून अभय पाटील 2 हजार मतांनी आघाडीवर आहेत. कोंडुस्कर यांनी 9 हजारांचा फरक कमी केला.
  • ECI नुसार, काँग्रेसने 115 जागांवर आघाडी घेतली आहे, भाजप 73 जागांवर आघाडीवर आहे तर JDS 29 जागांवर आघाडीवर आहे.

  • माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना मोठा धक्का. शिवमोग्गा जिल्ह्यातील ७ पैकी ५ जागांवर भाजप पिछाडीवर आहे. आठव्या फेरीच्या मतमोजणीनंतर जगदीश शेट्टर हे भाजपचे उमेदवार महेश टेंगीनकाई यांच्या विरोधात ११ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. एचडी कुमारस्वामी आणि त्यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी त्यांच्या मतदारसंघात आघाडीवर. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कनकपुरातून डीके शिवकुमार आघाडीवर.
  • अथणी मतदारसंघातून काँग्रेसचे लक्ष्मण सौदी पाचव्या फेरी अखेर तब्बल 17000 मतांनी पुढे
  • खानापुरातून भाजपचे विठ्ठल हलगेकर 12300 मतांनी पुढे
  • काँग्रेस 100 मतदारसंघात आघाडीवर आहे
  • 224 पैकी 197 विधानसभा मतदारसंघांच्या ट्रेंडनुसार भाजप 68 जागांवर तर जेडीएस 24 जागांवर आघाडीवर आहे.
  • पाचव्या फेरीत बेळगाव ग्रामीण मधून काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर 5 हजार मतांनी पुढे.
  • काँग्रेस 100 मतदारसंघात आघाडीवर आहे. तर भाजप 68 जागांवर आणि जेडीएस 24 जागांवर आघाडीवर आहे.
  • काँग्रेस – 95, भाजप – 64, JD(S) – 22 जागांवर आघाडी
  • कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी बेंगळुरूमधील एका मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
  • कर्नाटकमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते 95 विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या आघाडीचा आनंद साजरा करत आहेत. बेंगळुरूमधील काँग्रेस कार्यालयातही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

  • बेळगाव ग्रामीण (तिसरी फेरी) : लक्ष्मी हेब्बलकर – 10352, आर.एम.चौगुले – 8616
  • निपाणी (पहिली फेरी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम पाटील : 3559, भाजप आमदार शशिकला जोल्ले : 2597, काँग्रेसचे काकासाहेब पाटील : 2877
  • खानापूर : विठ्ठल हलगेकर भाजप – 3042 आघाडीवर, अंजली निंबाळकर काँग्रेस – 1466, मुरलीधर पाटील – 251
  • गोकाक मतदार संघात महातेश कडाडी 500 मतांनी पुढे
  • यमकनमर्डी मतदार संघात दोन फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून भाजप उमेदवार बसवराज हुंद्री हे तिसऱ्या स्थानावर आहेत.
  • बेळगाव ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर 1400 मतांनी आघाडीवर आहेत.
  • ECI नुसार, काँग्रेस 44 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 23 जागांवर तर जेडीएस 7 जागांवर आघाडीवर आहे.

  • बेळगाव ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर 1200 मतांनी आघाडीवर आहेत.
  • चिकोडी सदलगा मतदारसंघातून गणेश हुक्केरी आघाडीवर आहेत.
  • चामराजपेठेत भाजपचे भास्करराव काँग्रेसचे जमीर अहमद यांच्या विरुद्ध आघाडी घेत आहेत.
  • बेळगाव दक्षिणमध्ये दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झाली असून भाजपचे आमदार अभय पाटील साडेतीन हजार मतांनी पुढे आहेत.
  • गोकाक: रमेश जारकीहोळी मागे पडले.
  • पोस्टल मतदानात आतापर्यंत लक्ष्मण सवदी, अंजली निंबाळकर, रमेश जारकीहोळी,लक्ष्मी हेब्बाळकर, सतीश जारकीहोळी आघाडीवर

Karnataka Election Result 2023 Live : सुरुवातीच्या कलानुसार आतापर्यंत सुरुवातीच्या कलात आतापर्यंत 157 जागांचे कल हाती आले आहे. यामध्ये कांग्रेस 79, भाजप 63, जेडीएस 17, अन्य 1असे कल हाती आले आहेत. दरम्यान काँग्रेस भाजपमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेस पुढे जात आहे, असे वाटत असतानाच भाजपचाही आकडा वाढत आहे.

दरम्यान, मतमोजणीपूर्वी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सुरक्षेबाबत डीसी बेंगळुरू अर्बन, दयानंद के.ए. यांनी म्हटले की, प्रत्येक स्ट्राँग रूम, मतमोजणी हॉल आणि मतमोजणी केंद्र परिसरात नियोजनानुसार पुरेसे पोलिस कर्मचारी तैनात आहेत. बेंगळुरूमधील माउंट कार्मेल कॉलेज आणि सेंट जोसेफ कॉलेजच्या मतमोजणी केंद्रांचे त्याची काही छायाचित्रे एएनआयने दिली आहे.

याशिवाय आज विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हुबळी येथील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

Back to top button