Twitter Blue Tik : या सेलिब्रिटींपुढे मस्क नमला, पैसे भरले नाही तरी ब्लू टिक केले परत | पुढारी

Twitter Blue Tik : या सेलिब्रिटींपुढे मस्क नमला, पैसे भरले नाही तरी ब्लू टिक केले परत

पुढारी ऑनलाइन डेस्क : ट्विटरचा मालक एलॉन मस्क यांना त्याच्याच निर्णयावरून यु टर्न घ्यावे लागले आहे. ट्विटर ब्लू साठी Twitter Blue Tik पैसे न भरलेल्या अनेक सेलिब्रिटींच्या खात्यावरील ब्लू टिक गुरुवारनंतर काढून टाकण्यात आले होते. याची खूप मोठी चर्चा रंगली होती. ज्या सेलिब्रिटींचे ब्लू टिक काढून टाकण्यात आले. त्यापैकी अनेक सेलिब्रिटी असे आहेत ज्यांनी या सर्व गोष्टींकडे दूर्लक्ष केले. तसेच ब्लू टिक सब्स्क्रिप्शनसाठी विरोध केला. त्यानंतर काही सेलिब्रिटींच्या खात्यावर ब्लू टिक पुन्हा दिसू लागले. त्यामुळे हे नेमके कसे घडले याविषयी चर्चा सुरू आहे.

ट्विटरचा मालक एलॉन मस्क नुकतेच ब्लू टिक सब्स्क्रिप्शनसाठी Twitter Blue Tik पैसे न भरलेल्यांच्या खात्यावरून ब्लू टिक काढून टाकले होते. व्हेरिफाइड अकाउंट्सवरील ब्लू टिक 20 एप्रिलपासून सशुल्क असतील त्यानंतर ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांच्या अकाउंटवरील ब्लू टिक काढून टाकण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र अनेक सेलिब्रिटींनी याकडे दूर्लक्ष करत पैसे भरले नाहीत. त्यानंतर अभिनेता, अभिनेत्री, राजकीय नेते, खेळाडू अशा अनेक सेलिब्रिटींच्या अकाउंटवरील ब्लू टिक काढून टाकण्यात आले होते.

या यादीत प्रसिद्ध फुटबॉल पटू क्रिस्टियानो रोनाल्डो, ट्विच स्ट्रीमर हसन पिकर, पत्रकार आणि लेखिका कारा स्विशर, महान फलंदाज सचिन तेंडुलकर, दिग्गज फलंदाज विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आदींसह अनेक खेळ, कला आणि क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा यात समावेश आहे. Twitter Blue Tik

मात्र, यापैकी काही सेलिब्रिटी असे आहेत की ज्यांनी ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घेतले नसले तरी त्यांच्या काढून टाकण्यात आलेले ब्लू टिक त्यांना परत मिळाले आहे. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी पैसे भरले नसल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे मस्कच्या या निर्णयाची पुन्हा चर्चा होत आहे.

Twitter Blue Tik : या सेलिब्रिटींसाठी भरले मस्कने स्वतः भरले पैसे

मस्कच्या गेल्या ट्विटमध्ये त्याने म्हटले होते की तो ब्लू टिक्स लेब्रॉन जेम्स, स्टीफन किंग आणि विल्यम शॅटनरसाठी स्वतः पैसे देत आहेत. त्याच्या या ट्विटमधून असले वाटत होते की जसे तो त्यांच्यावर उपकार करत आहे.

मात्र, नंतर आता, असे लक्षात आले आहे की, ज्या सेलिब्रिटींचे लाखो फोलोअर्स आहेत. त्या सर्व सेलिब्रिटींचे ब्लू टिक परत आले आहे. इतकेच नाही काही दिवंगत सेलिब्रिटींची सुप्त खाती देखली ट्विटर ब्लू चे सदस्य असल्याचे दिसत आहे. यामध्ये ट्विच स्ट्रीमर हसन पिकर, पत्रकार आणि लेखिका कारा स्विशर, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि स्टीफन किंग हे काही सेलिब्रिटीज ज्यांना ब्लू टिक परत मिळाले आहे आणि त्यांनी त्यासाठी पैसे दिले नाहीत याची पुष्टी केली आहे.

Twitter Blue Tik : या सेलिब्रिटींनी त्यांनी पैसे भरले नसल्याची पुष्टी केली

हसन पिकरने लिहिले, “हे कसे घडले, हे मला काहीच कळले नाही, मी ट्विटर ब्लू विकत घेतले नाही,” तर कारा स्विशरने या हालचालीबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

ओमर अब्दुल्ला यांनी लिहिले, “वरवर पाहता मी ट्विटर ब्लूसाठी पैसे दिले आहेत आणि त्यांना सत्यापित करण्यासाठी एक फोन नंबर दिला आहे. असे दिसते मात्र मी ते दिलेले नाही, असे म्हणत ओमर यांनी मिस्टर मस्क तुम्ही माझे पैसे देखील देत आहात का?” असे विचारले.

लेब्रॉन जेम्स, स्टीफन किंग आणि विल्यम शॅटनर हे पहिल्या सेलिब्रिटींपैकी होते ज्यांना त्यांचे ब्लू टिक परत मिळाले. मस्कने स्वत: या खात्यांसाठी पैसे भरल्याची पुष्टी केली.

स्टीफन किंगने त्याच्या ब्लू टिकबद्दल बोलताना लिहिले, “माझे ट्विटर खाते म्हणते की मी ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घेतले आहे. मी नाही. माझे ट्विटर खाते म्हणते की मी फोन नंबर दिला आहे. मी नाही.”

दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, “मला वाटते की मिस्टर मस्क यांनी माझा निळा चेक धर्मादाय संस्थेला द्यावा. मी युक्रेनमध्ये जीवनरक्षक सेवा पुरवणार्‍या प्रितुला फाऊंडेशनची शिफारस करतो. ते फक्त $8 आहे, त्यामुळे कदाचित मिस्टर मस्क आणखी थोडी भर घालू शकतील.”

Twitter Blue Tik : बॉलीवूड सेलिब्रिटीजचे ब्लू टिक आले परत

ट्विटरच्या नवीन अपडेटचा भाग म्हणून आलिया भट्ट, विराट कोहली, शाहरुख खान यासारख्या बॉलीवूड सेलिब्रिटींनी देखील त्यांचे ब्लू टिक गमावले. तथापि, या सर्व सेलिब्रिटींसाठी ब्लू टिक्स परत आले आहेत. या सेलिब्रिटींनी या प्रकरणाबद्दल अद्याप काहीही सांगितले नाही. त्यामुळे मस्क त्यांच्यावरही उदार आहेत असे मानण्यास हरकत नाही असे दिसते.

तर अमिताभ बच्चन यांच्या खात्यावरील भोजपूरी भाषेतील ट्विटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, यामुळे एक संभ्रम देखील निर्माण झाला होता की हे खाते खरोखरच अमिताभ यांचे आहे का नाही. तसेच अमिताभचे हे खाते असले तरी त्यांनी खरोखरच पैसे भरले आहेत का मिश्कील टिप्पणी केली आहे. असा प्रश्न पडतो. त्यानंतर त्यांनी ब्लू टिक परत मिळाल्यासाठी तू चीज बडी है मस्क मस्क असे ट्विट करीत मस्कचे आभार देखील मानले. त्यामुळे अमिताभ यांना पुन्हा मिळालेले ब्लू टिक पेड आहे की अनपेड आहे, हे अजूनही संदिग्ध आहे.

हे ही वाचा :

‘ये दिल मांगे मोअर’ ‘अप्सरे’चा ट्रॅडिशनल लूक पाहून चाहत्यांचा तोल घसरला…!

MPSC Combine Exam : ‘हॉल तिकीट’ व्हायरल; MPSC ने केला खुलासा

Back to top button