Wrestlers Protest | कुस्तीपटू बजरंग पुनियाची ‘ती’ पोस्ट डिलिट करूनही चर्चेत; काय आहे कारण? | पुढारी

Wrestlers Protest | कुस्तीपटू बजरंग पुनियाची 'ती' पोस्ट डिलिट करूनही चर्चेत; काय आहे कारण?

पुढारी ऑनलाईन : राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर सध्या कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ कुस्तीपटू बजरंग पुनिया देखील या आंदोलनात पुढे आहे. त्याने बजरंग दलावरून सुरू असलेल्या वादा दरम्यानच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘मै बजरंगी हूँ..!’ (Wrestlers Protest) अशी पोस्ट शेअर केली होती. यानंतर काही वेळातच त्याने आपली ही पोस्ट डिलीट केली आहे. त्याच्या बजरंग दलाच्या समर्थनार्थ असलेली ही पोस्ट डिलीट करून देखील ही पोस्ट चर्चेत राहिली आहे.

पुनिया याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हिंदू संघटना बजरंग दलाच्या समर्थनार्थ एक स्टोरी (Wrestlers Protest) शेअर केली होती. यामध्ये त्यांनी एक फोटो टाकला होता. ज्यामध्ये “मी बजरंगी आहे आणि मी बजरंग दलाला सपोर्ट करतो” असे लिहिले होते. तसेच त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लोकांना हि पोस्ट व्हॉट्सअॅप स्टेटसला लावण्याचे आणि पिक्चर प्रदर्शित करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Wrestlers Protest : बजरंग पुनियाने पोस्ट का हटवली?

पुनियाच्या या पोस्टवर इंस्टाग्रामवरील युजर्सच्या एका वर्गाने जोरदार टीका केली. त्यानंतरच त्यांनी त्यांची पोस्ट डिलीट केली. त्याने कर्नाटक विधानसभा निवडणूकीदरम्यान ही पोस्ट केली आहे. कारण काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात पक्ष सत्तेत आल्यानंतर बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन येथील जनतेला दिले आहे. काही युजर्संनी बजरंग पुनिया यांच्या या इंन्स्टा स्टोरीला विरोध केल्याने त्याने तात्काळ ही पोस्ट सोशल मीडियावरून हटवली आहे.

Wrestlers protest : जंतरमंतरवर कुस्तीपटूंसह शेतकरीही हिंसक

भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पाठिंबा दिलेल्या शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जंतर मंतरवर पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून टाकले. हरियाणा तसेच पंजाबमधील शेतकरी संघटना तसेच खाप पंचायतींचे सदस्य मागील काही दिवसांपासून कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी जंतर मंतरवर ठाण मांडून आहेत.

लैंगिक शोषणाचा आरोप झालेल्या बृजभूषण सिंग यांना 15 दिवसांच्या आत अटक केली नाही तर देशभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी नुकताच आंदोलन स्थळी जाऊन केंद्र सरकारला दिला होता. हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सामील होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान दिल्लीतील टिकरी तसेच अन्य सीमांवरील सुरक्षा पोलिसांनी वाढविली आहे.

हेही वाचा:

Back to top button