SCO Summit 2023 : एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला धुतले; दहशतवादच्या गुन्हेगारांसोबत चर्चा होणार नाही | पुढारी

SCO Summit 2023 : एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला धुतले; दहशतवादच्या गुन्हेगारांसोबत चर्चा होणार नाही

पणजी; पुढारी ऑनलाईन : गोव्यातील पणजी येथे SCO (Shanghai Cooperation Organisation) ची बैठक संपन्न होत आहे. यामध्ये या विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी भारताचे पराराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Minister of External Affairs S. Jaishankar) यांनी भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारींशी सुद्धा जयशंकर यांनी भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानवर सडकून टीका करत म्हणाले, दहशतवादचे बळी असणारे दहशतवादाच्या गुन्हेगारांसोबत एकत्र बसून चर्चा करत नाहीत. (SCO Summit 2023)

एससीओ बैठकीत दहशतवादावर चर्चा (SCO Summit 2023)

एससीओ बैठकीदरम्यान आपल्या भाषणात भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आणि अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला लक्ष्य केले. जयशंकर म्हणाले की, दहशतवादाचा नाश सुरूच आहे. आमचा ठाम विश्वास आहे की दहशतवाद कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही आणि तो थांबलाच पाहिजे. यामध्ये सीमापार दहशतवाद आणि इतर सर्व प्रकारच्या दहशतवादाचा समावेश आहे. SCO बैठकीचा मूळ उद्देश दहशतवादाचा मुकाबला करणे हा आहे.


पाकिस्तानने विश्वार्हता गमावली

पत्रकारांशी बोलताना एस. जयशंकर म्हणाले, पाकिस्तानने आपली विश्वासर्हता त्यांच्या विदेशी चलन साठ्यापेक्षाही झपाट्याने कमी होत चालली आहे. दहशतवादाचे बळी दहशतवादावर चर्चा करण्यासाठी दहशतवादी गुन्हेगारांसोबत एकत्र बसत नाहीत. दहशतवादाचे बळी स्वतःचा बचाव करतात, दहशतवादाचा प्रतिकार करतात.

अधिक वाचा :

Back to top button