Encounter in Rajouri (J&K) | जम्मू काश्मीरमध्ये चकमक, दोन जवान शहीद तर ४ जखमी | पुढारी

Encounter in Rajouri (J&K) | जम्मू काश्मीरमध्ये चकमक, दोन जवान शहीद तर ४ जखमी

पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये शुक्रवारी (दि.५) सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. राजौरीमधील कंडी या भागात सकाळी साडेसातच्या दरम्यान ही चकमक सुरू झाली होती. सुमारे ६ तास सुरू असलेल्या या चकमकीदरम्यान भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह ४ जवान जखमी (Encounter in Rajouri (J&K)) झाले आहेत. जखमी जवानांना उधमपूरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्राथमिक वृत्तानुसार, या भागात दहशतवाद्यांचा आणखी एक गट लपून बसला असून, पुन्हा आणखी एकदा लष्कर आणि दहशतवादी गटांमध्ये चकमकीची शक्यता आहे. सर्च ऑपरेशन सुरू (Encounter in Rajouri (J&K) असून, या संदर्भात पुढील तपशील तपासला जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इंटरनेट सेवा सध्या बंद करण्यात आली आहे. असे देखील लष्कराने सांगितले आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, परिसरात दहशतवादी असल्याच्या विशिष्ट माहितीवरून पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. यावेळी संयुक्त पथके संशयित ठिकाणी पोहोचताच, लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, लष्कराने देखील प्रत्युत्तर दिल्याने चकमक Encounter in Rajouri (J&K) सुरू झाली.

चकमकी दरम्यान दहशतवाद्यांनी स्फोटकांचा वापर केल्याने यामध्ये दोन जवान शहीद झाले. तर एका अधिकाऱ्यासह चार जण जखमी झालेत. जवळपासच्या भागातून अतिरिक्त पथके चकमकीच्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या एका गटाने परिसरात घेरले आहे. अजूनही चकमक सुरूच आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने Encounter in Rajouri (J&K) दिली आहे.

हेही वाचा:

Back to top button