चवीला तेज तर्रार असलेली नुसती मिरी खाणं अशक्य आहे. त्यामुळेच मिरी आणि मधाचं चाटण सर्दी दरम्यान घेण्यास कायम सुचवलं जातं.
लसणातील अलिसिन या घटकामुळे घसा लवकर बरा होण्यास मदत होते. पण नुसतं लसूण चावून खाणं अनेकांना आवडत नाही. यासाठी लसणाच्या पाकळीचे मधासोबत सेवन करा.
सर्दी आणि घसादुखीवर ॲपल सिडार व्हीनेगर अत्यंत गुणकारी आहे. सर्दी आणि घसा दुखत असेल तर कोमट पाण्यात ॲपल सिडार व्हीनेगर, मध आणि दालचीनी पावडर एकत्र करून घ्यावे
तुळस : तुळस केवळ हवाच शुद्ध करत नाही तर सर्दी आणि घसादुखी यावरही गुणकारी आहे.