Sharad Pawar Resign : शरद पवारांनी निवड समितीच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी वेळ मागितला – प्रफुल्ल पटेल | पुढारी

Sharad Pawar Resign : शरद पवारांनी निवड समितीच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी वेळ मागितला - प्रफुल्ल पटेल

पुढारी ऑनलाइन डेस्क : राष्ट्रवादीच्या निवड समितीचा शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा आणि त्यांनीच अध्यक्ष पदावर कायम राहावे या प्रस्तावावर विचार करण्यासाठी शरद पवार यांनी वेळ मागितला, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करून शरद पवार यांनीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या निवड समितीने एकमताने मंजूर केला. ठराव मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. त्यांना समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देत राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. त्यावर पवारांनी मला थोडा वेळ द्या, मी विचार करतो असे त्यांना सांगितले. त्यामुळे शरद पवार आज निर्णय देणार की उद्या याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवारांच्या भेटीनंतर पटेल यांनी सांगितले की, आम्ही बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती शरद पवार यांना दिली. त्यांना आम्ही राजीनामाचा निर्णय मागे घेण्याबाबत सर्वांच्या असलेल्या भावना कळविल्या आहेत. त्यांनी आम्हाला निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला असून त्यांचा निरोप आल्यानंतर पुढील गोष्टी कळविल्या जातील.

शरद पवार यांनी काल कार्यकर्त्यांशी बोलताना दोन दिवसात निर्णय घेण्याबाबत सुचवले होते. त्यानुसार पवार आज किंवा उद्या आपला निर्णय जाहीर करू शकतात.

हे ही वाचा :

Sharad Pawar News Updates | राष्ट्रवादीच्या ठरावानंतर शरद पवार खरंच यू टर्न घेतील का?

Sharad Pawar News Updates | राष्ट्रवादीच्या ठरावानंतर शरद पवार खरंच यू टर्न घेतील का?

Back to top button