WhatsApp Update | आता एकाच वेळी ४ फोनवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार, जाणून घ्या कसे? | पुढारी

WhatsApp Update | आता एकाच वेळी ४ फोनवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली; वृत्तसेवा : गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp Update) मोठा बदल केला आहे. आता वापरकर्ते एकाच वेळी ४ फोनमध्ये एकच खाते (लॉग-इन) वापरू शकतील. व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या मदतीने वापरकर्ते फोन आणि पीसी (डेस्कटॉप) दोन्हीमध्ये समान खाते वापरू शकतात, परंतु आता हे वैशिष्ट्य फोनसाठीदेखील उपलब्ध असेल.

व्हॉट्सअ‍ॅपकडून मार्चमध्ये ४७ लाख खात्यांवर बंदी

वापरकर्त्यांच्या तक्रारी आणि नियमांच्या आधारे व्हॉट्सअ‍ॅपने मार्च २०२३ मध्ये भारतात ४७ लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या मासिक अहवालानुसार, कंपनीने १ मार्च ते ३१ मार्च २०२३ दरम्यान ४,७१५, ९०६ भारतीय वापरकर्त्यांच्या खात्यांवर बंदी घातली आहे.

भारतीय कायदा आणि व्हॉट्सअॅपच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. व्हॉट्स अॅपवर ४,७२० तक्रारी आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी ४,३१६ तक्रारींनी खाते बंद करण्याचे आवाहन केले होते, मात्र, व्हॉट्सअ‍ॅपने केवळ ५८५ तक्रारींवर कारवाई केली आहे. फेब्रुवारीमध्ये ४६ लाख भारतीय वापरकर्त्यांवर बंदी लादण्यात आली. याआधी फेब्रुवारीमध्ये व्हॉट्सअॅपने ४६ लाख भारतीय यूजर्सवर बंदी घातली होती. यापूर्वी जानेवारीमध्ये २९ लाख, डिसेंबरमध्ये ३६ लाख आणि नोव्हेंबरमध्ये ३७ लाख खाती बंद करण्यात आली होती.

खाते बंदी का आहे?

कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्याने त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारा, धमकावणारा किंवा त्रास देणारा, द्वेष पसरवणारा किंवा भडकावणारा मजकूर शेअर केला, तर त्याच्या खात्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, जर एखाद्या वापरकर्त्याने कंपनीच्या नियम आणि अटींचे उल्लंघन केले तर त्याचे खातेदेखील बॅन केले जाऊ शकते. (WhatsApp Update)

 

                  हेही वाचलंत का ? 

 

 

 

Back to top button