WhatsApp Features: व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फिचर लाँच; अनोळखी नंबर करता येणार म्यूट | पुढारी

WhatsApp Features: व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फिचर लाँच; अनोळखी नंबर करता येणार म्यूट

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मेसेजिंग आणि कॉलिंग सुधारण्यासाठी सतत नवीन अपडेट आणत आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅप आणखी एक नवे नवीन अपडेट आणत आहे. या नव्या अपडेटमुळे आता ग्रुप कॉल फिचर मध्ये मोठा बदल होणार आहे. युजर्स आता अनोळखी नंबरवरुन येणारे कॉल म्युट करु शकतील. सध्यातरी हे फिचर अँड्रॉईड युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे. अपडेट संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर सर्व युजर्सना लवकरच हातळता येणार आहे.

व्हॉट्सअॅप मध्ये आतापर्यंत अनोळखी नंबर म्यूट करण्याविषयीचा पर्याय उपलब्ध नव्हता. आता मात्र नविन अपडेटनंतर हा हे मॅसेजिंग अॅपमध्ये सेटिंगमध्ये हा पर्याय उपलब्ध असणार आहे. हे फिचर्स निवडल्यानंतर जो नंबर युजरच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसेल आणि त्या व्हॉट्सअॅप नंबरवरुन जर कॉल येत असेल तर तो नंबर म्यूट करता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या स्पॅम कॉलचे प्रमाण वाढत आहे. अशा कॉल्सना आळा घालण्यासाठी हे फिचर आणले आहे. याआधी ग्रुप कॉल चालू असताना एकाच व्यक्तीला म्यूट करता येत होते. आणखी लोकांना म्यूट करायचे असेल तर सगळेच नंबर म्यूट होत होते. मात्र आता या नव्या अपडेटमुळे संपूर्ण ग्रुप कॉल म्यूट होत होता.

व्हॉट्सअ‍ॅपने काही दिवसांपूर्वीच एक नवे फिचर दिले आहे. ते फिचर युजर्सना स्प्लिट स्क्रीनची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. ज्यामुळे युजरला चॅट किंवा कॉल दरम्यान अन्य फिचर वापरता येईल. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या सुधारित आवृत्तीमुळे मेसेजिंग अ‍ॅपमध्ये चाहता वर्ग वाढत आहे.

हेही वाचा

Back to top button