Go First Airlines आर्थिक संकटामुळे ३ आणि ४ मे रोजी राहणार बंद, कंपनीचे 'सीईओ' म्‍हणाले... | पुढारी

Go First Airlines आर्थिक संकटामुळे ३ आणि ४ मे रोजी राहणार बंद, कंपनीचे 'सीईओ' म्‍हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गो फर्स्ट एअरलाइन्सने ( Go First Airlines ) पुढील तीन दिवस आपली सर्व तिकिट बुकिंग बंद केले आहे. वाडिया यांची मालकी असणार्‍या GoFirst ने तेल विपणन कंपन्यांच्या थकबाकीमुळे ३ आणि ४ मे साठी उड्डाणे स्थगित केली आहे.

यासंदर्भात माहिती देताना Go First Airlines सीईओ कौशिक खोना यांनी सांगितले की, सध्‍या कंपनीला आर्थिक निधीची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्‍यामुळे ३ आणि ४ मे रोजी कंपनीने विमान उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. P&W कडून इंजिनचा पुरवठा न झाल्यामुळे कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत आहे, ज्यामुळे २८ विमाने धावपट्‍टीवरच उभी आहेत. GoFirst एअरलाइन्‍सच्‍या ६० टक्क्यांहून अधिक उड्डाणे ग्राउंड करण्यात आली आहेत. ही उड्डाणे ग्राउंडेड असल्याने अनेक मार्गांवर एअरलाईन बुकिंग रद्द होत आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button