Karnataka Election 2023 : बजरंग दल, 'पीएफआय'वर बंदी घालणार, २०० युनिट मोफत वीज, महिलांसाठी मोफत प्रवास...

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात ( Congress Releases Manifesto ) पक्षाचे ठराव जनतेसमोर मांडले आहे. यावेळी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
(Karnataka Election 2023 )
Karnataka Election 2023 : ‘पीएफआय’ची तुलना बजरंग दलाशी!
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बंदी असलेल्या इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ची तुलना विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाशी केली आहे. द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांवर बंदी घातली जाईल. राज्यात पक्षाची सत्ता आल्यास द्वेषी संघटनांवर बंदी घालण्यासह कायद्यानुसार निर्णायक कारवाई केली जाईल, अशीही ग्वाही देण्यात आली आहे. जात किंवा धर्माच्या आधारे समाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले. कायदा आणि राज्यघटना पवित्र आहेत, बजरंग दल आणि पीएफआय सारख्या संघटनांकडून त्याचे उल्लंघन होऊ शकत नाही, असेही जाहीरनाम्यात नमूद केले आहे.
२०० युनिट मोफत वीज, महिलांना मोफत प्रवास
काँग्रेसने जाहीरनाम्यात ( Congress Releases Manifesto )अनेक योजना राबविण्याची ग्वाही दिली आहे. यामध्ये गृह ज्योती योजनेंतर्गत सर्वांना 200 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. बीपीएल कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीचे १० किलो धान्य दिले जाईल, गुरु लक्ष्मी योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये देण्यात येईल, असेही आश्वासन या जाहीरनाम्याच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
सर्व महिलांसाठी नियमित KSRTC/BMTC बसमधून प्रवास मोफत केला जाईल. त्याचबरोबर बेरोजगार तरुणांनाही डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी बेरोजगार पदवीधरांना दोन वर्षांसाठी दरमहा तीन हजार रुयेत 3,000 रुपये तर युवा निधी योजनेअंतर्गत बेरोजगार पदविकाधारकांना दीड हजार रुपये प्रति महिना देण्याची घोषणाही काँग्रेसने जाहीरनाम्यात केली आहे.
Karnataka Polls: “Will ban…,” Congress cites Bajrang Dal, PFI in manifesto
Read @ANI Story | https://t.co/dPNHfON1oR#KarnatakaElections2023 #KarnatakaElections #Congress #PFI #Manifesto pic.twitter.com/hV7tPVZsxW
— ANI Digital (@ani_digital) May 2, 2023