ओडिसा किनारपट्टीवर पीएम मोदींच्या ‘मन की बात’ १०० व्या भागाचे कलाकाराने साकारले ‘वाळू शिल्पकृती’

ओडिसा किनारपट्टीवर पीएम मोदींच्या ‘मन की बात’ १०० व्या भागाचे कलाकाराने साकारले ‘वाळू शिल्पकृती’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.३०) सकाळी ११ वाजता 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमातून जनतेला संबोधित करणार आहेत. मन की बात या कार्यक्रमाचा हा १०० वा भाग आहे. भारतीयांसाठी आणि येथील जनतेसाठी हा ऐतिहासिक संवादाचा क्षण मानला जात आहे. यानिमित्त देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, ओडिसातील प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पट्टनायक यांनी किनारपट्टीवर या ऐतिसाहिक क्षणाचे औचित्य साधत, वाळू शिल्पकृती साकारली आहे.

ओडिसा येथील वाळू शिल्पकार सुदर्शन पट्टनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या १०० व्या भागानिमित्त ही वाळू शिल्पकला साकारली आहे. ओडिसामधील पुरी बीचवर ही शिल्पकृती तयार करण्यात आली आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या १०० व्या भागाच्या माध्यमातून आज पीएम मोदी भारतीयांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे भारतासहित जगभरातील भारतीय आणि परदेशी नागरिक देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओ कार्यक्रम 'मन की बात'चा १०० वा भाग आज प्रसारित होणार आहे. या भागाचे प्रसारण संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या मुख्‍यालयातही होणार आहे. दरम्‍यान, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनीही या खास प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. तसेच या निमित्त महाराष्ट्रातील पुणे या शहरात आज ऐतिहासिक प्रसंगी १ हजार ठिकाणी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रमुख जगदीश मुळीक यांनी दिली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news