मन की बात @100 : मन की बात ऐतिहासिक ठरले; आमिरने मोदींचे केले कौतुक (Video) | पुढारी

मन की बात @100 : मन की बात ऐतिहासिक ठरले; आमिरने मोदींचे केले कौतुक (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ‘मन की बात @100’ कॉन्क्लेवमध्ये सहभागी झाला. याविषयीचा आमिर खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमिर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना दिसत आहे. आमिर खानने पीएम नरेंद्र मोदी यांच्या ऑल इंडिया रेडिओवर प्रसारित होणारा कार्यक्रम ‘Mann Ki Baat’ चे कौतुक केले. ऑल इंडिया रेडिओवर ‘मन की बात’ प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो, या माध्यमातून मोदी देशवासियांशी संवाद साधतात. (मन की बात @100)

आमिर खानने पीएम मोदींचे केले कौतुक

आमिर खान म्हणाला, ‘मन की बात’ने भारतवासींवर खोल प्रभाव टाकला आहे. हे एक एतिहासिक ठरले आहे, ज्याची सुरुवात आमच्या पंतप्रधानांनी केली आहे. व्हिडिओमध्ये आमिर खानसोबत बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनदेखील दिसतेय. ऑल इंडिया रेडिओवर ‘मन की बात’ची सुरुवात ३ ऑक्टोबर, २०१४ रोजी झाली होती. त्यानंतर प्रत्येक महिन्याला हा कार्यक्रम प्रसारित होतो.

‘मन की बात @100’ मध्ये राजकीय नेते, क्रीडा आणि संगीत जगतातील लोकदेखील सहभागी झाले होते.

Back to top button