'मन की बात' @100 परिषदेचे उपराष्टपती धनखड यांच्या हस्ते उद्घाटन | पुढारी

'मन की बात' @100 परिषदेचे उपराष्टपती धनखड यांच्या हस्ते उद्घाटन

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार. ३० एप्रिल रोजी ‘मन की बात’ कार्यक्रमातून भारतातीयांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाचा हा १०० वा भाग आहे. यानिमित्त राष्ट्रीय चर्चासत्रासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसार भारतीने आयोजित केलेल्या ‘मन की बात @ 100’ परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. या परिषदेचे उद्घाटन आज (दि.२६) उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या हस्ते झाले. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमातील सत्रांमध्ये अभिनेता आमिर खान, अभिनेत्री रविना टंडन यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी होणार आहेत.

याबाबत ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तात म्‍हटलं आहे की, पीएम मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १०० व्या भागात विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील विविध सत्रात दिग्गज व्यक्ती सहभागी होणार आहेत. यामध्ये चित्रपट अभिनेता आमिर खान, अभिनेत्री रविना टंडन यांच्‍यासह पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल किरण बेदी, संगीतकार रिकी केज, वादक निखत जरीन आणि दीपा मलिक, कथाकार नीलेश मिश्रा, उद्योजक संजीव भिकचंदानी आणि टीवी मोहनदास पै सहभागी होणार आहेत.

रविवारी (दि.३०) होणाऱ्या ‘मन की बात’ च्या १०० व्या भागानिमित्त प्रसार भारतीने राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये स्त्री शक्ती, वारसा परंपरा जतन, जन-संवादातून आत्मनिर्भरता आणि आवाहनातून चळवळ या विषयांवर आज (दि.२६) चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयांवर अनेक दिग्गज देशवासीयांशी संवाद साधणार आहेत.

या कार्यक्रमाच्या समारोप गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाने होणार आहे. यावेळी ‘मन की बात’ च्या स्मरणार्थ एक नाणे आणि टपाल तिकीट जारी केले जाणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्रीमंडळातील गृहमंत्री अमित शाह परिषदेच्या समारोप सत्राला केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी उपस्थित राहणार आहेत.

‘मन की बात’@100: राष्ट्रीय चर्चा सत्र कार्यक्रम

बुधवार(दि.२६)

सत्र-१: महिला शक्ती (सकाळी 11:30 ते 12:30 पर्यंत)
पॅनेल सदस्य: ऋचा अनिरुद्ध (समन्वयक)
• किरण बेदी
• दीपा मलिक
• धिमंत पारेख
• आरजे नितीन
• रवीना टंडन
• निखत जरीन
• पूर्णा मलावत

सत्र-2: वारसा परंपरा (दुपारी 12:30 ते दुपारी 01:30 पर्यंत)
पॅनेल सदस्य: नीलेश मिश्रा (समन्वयक)
• रिकी केज
• आरजे सिड कन्नन
• पालकी शर्मा
• जगत किंखाबवाला
• रोचामलियाना

सत्र-3: जन-संवादातून आत्मनिर्भरता (दुपारी 02:30 ते दुपारी 03:30 पर्यंत)
पॅनेल सदस्य: श्रद्धा शर्मा (समन्वयक)
• आरजे रौनक
• टीवी मोहनदास पै
• संजीव बिखचंदानी
• रवि कुमार नर्रा

सत्र-4: आवाहनाद्वारे जनआंदोलन (दुपारी 03:30 ते दुपारी 04:30पर्यंत)
पॅनेल सदस्य: आरजे शरथ (समन्वयक)
• आमिर खान
• शशांक जोशी
• करिश्मा मेहता
• नझम अख्तर
• दीपमाला पांडे

हेही वाचा :

 

Back to top button