अवयव दान करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ४२ दिवसांची विशेष सुटी | पुढारी

अवयव दान करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ४२ दिवसांची विशेष सुटी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अवयव दान करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४२ दिवसांची विशेष सुटी (कॅज्युअल लीव्ह) देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अवयव दानाची शस्त्रक्रिया ही महत्त्वाची शस्त्रक्रिया असते आणि त्यातून बरे होण्यासाठी वेळ लागतो. याचमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४२ दिवसांसाठी विशेष सुटीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कार्मिक मंत्रालयाकडून देण्यात आली.

अवयव दान करणाऱ्या व्यक्तीला सर्वप्रथम रुग्णालयात दाखल करावे लागते. शिवाय अवयव दान झाल्यानंतर त्याला काही काळ विश्रांती द्यावी लागते. अवयव दानामुळे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस जीवदान मिळते. या साऱ्या बाबी लक्षात घेऊन अवयव दान करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कमाल ४२ दिवसांची सुटी दिली जाईल. सर्व प्रकारचे अवयव दान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुटीचा लाभ घेता येणार असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button