

सध्या सर्वांनाच घाई असते, वेळ निवांतपणा कोणाकडेच नसतो. अगदी पाणी प्यायलाही उसंत नसण्याचा हा काळ आहे. त्यामुळे बहुतांश लोक पाणी उभ्यानेच पितात; पण आयुर्वेदानुसार उभ्याने पाणी प्यायल्यास अनेक आजार जडण्याची शक्यता असते. जाणून घेवूया उभे राहून पाणी पिल्याने शरीरावर होणार्या दुष्परिणामाविषयी…
उभे राहून पाणी प्यायल्यास मूत्रपिंडाचे काम नीटप्रकारे होत नाही. शरीरातील पाणी न गाळताच वाहून जाते. त्यामुळे मूत्रपिंड आणि मूत्राशय या दोन्हींमध्ये विषद्रव्ये तशीच राहू शकतात. याचा परिणाम म्हणजे मूत्रमार्गाचा संसर्ग होण्यात होतो.
'उभे राहून पाणी पिणार, त्याला सांधेदुखी होणार' असे जुने लोक म्हणायचे. ते खरेच आहे. भविष्यात होणार्या सांधेदुखीचे कारण उभे राहून पाणी पिण्याच्या सवयीत दडलेले असू शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने सांध्यातील वंगणाचे संतुलन बिघडून जाते आणि सांध्यातील हे वंगण तिथेच सांध्यात साठून राहते.
उभ्याने पाणी प्यायल्याने अन्ननलिकेतून पाणी वेगाने वाहून जाते. वेगाने धार ओतली गेल्याने पोटातील अंतत्वचा आणि आसपासच्या इतर अवयवांचे नुकसान होते. सतत असे उभ्याने पाणी प्यायल्याने पचनतंत्र बिघडून जाते.
उभे राहून पाणी प्यायल्याने तहान शमत नाही. त्यामुळे सतत तहान लागल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे सतत पाणी प्यायले जाते. पाणी नेहमीच बसून हळुहळू एक एक घोट घेऊन प्यावे.
पाणी बसून प्यायल्यास आपले स्नायू आणि मज्जासंस्था यांना विश्रांती मिळते. त्यामुळे पातळ पदार्थ पचण्यास मदत होते. मात्र, उभ्याने पाणी प्यायल्यास सतत अपचनाचा त्रास होतो. थोडक्यात उभ्याने पाणी पिण्याची सवय आजारांना आमंत्रण देते. थोडक्यात आरोग्य चांगले राहावे आणि आजारांनी शरीरात घर करू नये म्हणून बसून पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा :