IPL 2023 : डेव्‍हिड वॉर्नरला १२ लाखांचा दंड, SRH विरुद्धच्‍या सामन्‍यात केली ‘ही’ चूक | पुढारी

IPL 2023 : डेव्‍हिड वॉर्नरला १२ लाखांचा दंड, SRH विरुद्धच्‍या सामन्‍यात केली 'ही' चूक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रिमियर लीग ( आयपीएल ) स्‍पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला १२ लाख रुपये दंड ठोठावण्‍यात आला आहे. गोलंदाजांनी केलेल्‍या संथ ओव्‍हर-रेटचा फटका त्‍याला बसला आहे. हा सामना जिंकत दिल्‍लीने स्‍पर्धेतील आपलं आव्‍हान कायम ठेवले आहे.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सोमवारी ( दि.२५) दिल्ली कॅपिटल्‍स आणि सररायझर्स हैदराबाद हे आमने-सामने होते. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ९ बाद १४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद ६ गडी गमावत १३७ धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्‍लीचा यंदाचा हंगामातील हा दुसरा विजय ठरला आहे.

वॉर्नरला १२ लाखांचा दंड

सोमवारी झालेल्‍या सामन्‍यात दिल्‍ली कॅपिटल्‍सच्‍या गोलंदाजांनी वेळेवर षटके पूर्ण केली नाहीत.संथ ओव्‍हर-रेटचा फटका कर्णधार वॉर्नरला बसला. यासंदर्भात आयपीएलने प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की, ‘दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध स्लो ओव्हर रेट ठेवला. त्‍यामुळे त्याला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यंदाच्‍या आयपीएल हंगामातील दिल्‍ली कॅपिटल्‍स संघाची सुरुवात खूपच निराशाजनक होती. पहिल्‍या पाच सामन्‍यांमध्‍ये या संघाचा पराभव झाला. आतापर्यंत सात सामन्‍यांत दिल्ली कॅपिटल्स संघाने केवळ दोनच सामने जिंकले आहेत. गुणतालिकेमध्‍ये हा संघ शेवटच्या स्थानावर आहेत. तर सनरायझर्स हैदराबादचा सात सामन्यांमधला सोमवारी पाचवा पराभव झाला. हा संघ गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. शनिवारी पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

हेही वाचा :

 

Back to top button